दांडेली- एक अभयारण्य !! via चिंचणी -बेळगाव (क्रमशः)
"हॉर्नबिल" नावाच हे रेसोर्ट कर्नाटक राज्यातून वाहणाऱ्या काली नदीच्या काठावर वसले आहे.१८४ किलोमीटरच्या प्रवासानंतर पुढे ही नदी अरबी समुद्राला मिळते. रेसोर्ट नदीच्या काठावरच वसले असल्यामुळे वाहत्या पाण्याचे भले मोठे नदीपात्र बघायला मज्जा येते.ते पण निर्मळ पाण्याचे …. पुण्यासारख्या शहरात तर ते दुर्मिळच आहे. आम्ही या स्वच्छ पाण्यात मनमुराद खेळलो, पोहोलो आणि दमलो.आम्ही "tree House" घेतला होत. त्यामुळे झाडावर राहण्याचा हा पहिलाच प्रसंग.रूम मध्ये असलेल्या सगळ्या गोष्टींची रचना खूपच छान आणि सुटसुटीत होती. इतक्या शांततेत फक्त एका गोष्टीची खूप कमतरता जाणवली ते म्हणजे टीव्ही. पण तिथे आलेल्या लोकांनी निसर्गात राहून निसर्ग अनुभवावा म्हणून रेसोर्ट वाल्यांनी कुठ्लायचं रूम मध्ये टीव्हीची सोय केली नव्हती आणि ती आज पण नाही आहे.
बाहेर काळा कुट्ट अंधार, बेडकाचे डराव डराव, रातकिंड्याचे किर्र, खिडक्यांवर पडणाऱ्या झाडांच्या सावल्या हे सगळाच माझ्यासाठी जरा भयानक होत. माझी तर जाम टरकली. कधी एकदा सकाळ होईल असा झाला होता. आयुष्यात बघितलेले सगळे भूतांचे पिक्चर आठवत होते. काही केल्या मला झोप येईना. कधी नव्हे ते मारुतीपासून सगळ्या देवांना आठवावं लागला. शेवटी रात्री १२ च्या दरम्यान उठून मी आणि आदी रूम बदलून घेण्यासाठी care taker कडे गेलो. पण शुक्रवारची गर्दी असल्या कारणाने १ पण रूम शिल्लक नव्हती. नाईलाजाने परत माघारी यावे लागले आणि जीव मुठीत घेऊन झोपले.
पहाटे लवकर उठून आम्ही जंगल सफारीसाठी तयार झालो. आत्ता पर्यंत जिप्सी पहिली होती पण आज मी यात बसणार आहे या विचारामुळे खूपच खुश होते. काळ्या कुट्ट अंधारात अनेक पक्षांचे आवाज येत होते. कोणकोणत्या ते नाही समाजला पण कानाला फारच मधुर वाटत होते.गाडीच्या आणि टोर्च्या प्रकाशांत अनेक प्राणी पाहिले. सांबर ,हत्ती,गुबगुबीत ससे,हरिण यांचे सौदर्य जंगलातच पाहावे.
७ च्या दरम्यान प्रकाश पडायला सुरुवात झाली. अनेक रंगीबेरंगी फुलपाखरे बागडू लागली. खूप चंचल अशी पण मोहक फुलपाखरांचे असंख्य प्रकार आपल्याला या जंगलात पाहायला मिळतात. थोडा वेळ तर स्वप्नांच्या गावाला असल्याचा भास झाला जसा आत्ता कदाचित तुम्हाला होत असेल. बघता बघता ८ वाजले आणि आम्ही परतीच्या वाटेवर लागलो.
रेसोर्टवर नाष्ट्याची जय्यत तयारी होती. भूक लागल्यामुळे कि काय पण सगळेच पदार्थ पाहून तोंडाला पाणी सुटला. गरम गरम डोसे, इडली, कांदेपोहे आणि चहा या सगळ्यावर ताव मारून आम्ही river राफ्टिंगला निघालो. साधारण २ किलोमीटर नदीपात्र पार केल्यावर पाण्याचा जोर वाढला, खडकामुळे थंड पाण्याचे लोट अंगावर येत होते आणि बघता बघता आम्ही भिजलोच त्यात वरून पावसाने पण हजेरी लावली.
बराच वेळ वर्षा विहाराचा आनंद लुटला आणि दुपारच्या वेळी जरा आम्ही विसावा घेतला. संध्याकाळी नदी काठावर बसून मासे पकडण्याचा प्रयत्न केला. नंतर काही वेळ आजूबाजूच्या परिसरात निवांतपणे सहजच फिरत राहिलो आणि निसर्ग अनुभवत होतो. रात्री शेकोटी भोवती बसून शेकोटीची उब अनुभवली .
| हॉर्नबिल पक्षी |
दुसर्या दिवशी आरामात उठून परत एकदा नदीत डुमबायचा आनद आम्ही घेतला. आरामात आमचा समान आवरला आणि जेवण करून अनेक आठवणी मनात साठवून परतीच्या मार्गाला लागलो.
दांडेली आणि या सारखी अनेक निसर्गरम्य ठिकाण भारतात आहेत. जिथे निसर्ग, त्यातील शांतता, जंगलातील विविध प्राणी,पक्षी आपणास बरेच काही शिकवून जातात. या शांत वातावरणात आणि निसर्गाच्या सहवासात आपल्याला टीव्ही, मोबाईल फोन याची उणीव अजिबात भासत नाही. उलट याची जाणीव होते की आपण या साधनांशिवाय सुद्धा जगु शकतो . खूप अनमोल आहे हे.
अश्या या ठिकाणाला मी तर भेट दिली जमला तर तुम्ही सुद्धा आपल्या मित्रपरिवारासोबत आवश्यक भेट द्या. दांडेली आणि तेथील राहण्याची ठिकाण याची माहीती गुगलवर उपलब्ध आहे.
दांडेली आणि या सारखी अनेक निसर्गरम्य ठिकाण भारतात आहेत. जिथे निसर्ग, त्यातील शांतता, जंगलातील विविध प्राणी,पक्षी आपणास बरेच काही शिकवून जातात. या शांत वातावरणात आणि निसर्गाच्या सहवासात आपल्याला टीव्ही, मोबाईल फोन याची उणीव अजिबात भासत नाही. उलट याची जाणीव होते की आपण या साधनांशिवाय सुद्धा जगु शकतो . खूप अनमोल आहे हे.
अश्या या ठिकाणाला मी तर भेट दिली जमला तर तुम्ही सुद्धा आपल्या मित्रपरिवारासोबत आवश्यक भेट द्या. दांडेली आणि तेथील राहण्याची ठिकाण याची माहीती गुगलवर उपलब्ध आहे.


very Nice:-) Awesome
ReplyDeleteVery Nice ....!!!
ReplyDelete