दांडेली- एक अभयारण्य !! via चिंचणी -बेळगाव

"दांडेली" हे नाव लिहिल आणि मी एकदम २०१० मधेच पोहचले. दांडेलीशी आमच खूपच जवळचा नात, कारण This was our Honeymoon destination. आम्ही हे ठिकाण निवडायचा तस खास कारण होता ते म्हणजे लग्नानंतर आम्हाला आमच्या कुलदेवीचे दर्शन घ्यायाचे होते त्यामुळे पुणे -मिरज -चिंचणी -बेळगाव असा प्रवास मार्ग ठरला आणि बेळगाव जवळचा ठिकाण म्हणून आम्ही फारच कमी जणांना माहित असणाऱ्या  आणि "No phone, No TV, No disturbance" अशा दांडेलीला निवडल.  
ठरल्या प्रमाणे आम्ही दोघे मिरजेवरुन चिंचणी या ठिकाणी सकाळी सकाळी पोहोचलो. जून महिना असल्या कारणाने प्रचंड पावसाचा जोर आणि त्यात ते गाव. सगळीकडे पाणीच पाणी आणि आम्ही भिजलेलो, बरेच अंतर चालल्यावर आणि खूप शोधल्यावर एक  चहाची टपरी दिसली . विचारपूस केल्यावर मंदिराकडे जायचा मार्ग समाजला गरम चहाचा आस्वाद घेऊन पुन्हा आम्ही मंदिराकडे निघालो.
मुख्य प्रवेशद्वार 

मायाक्का देवीचे मंदिर फारच सुंदर आणि भव्य त्यात पावसामुळे स्वछ झाल्याने मंदिराचा विटकरी रंग आणखीनच उठून दिसत होता. मंदिर खूप commercial नसले तरी आंघोळीसाठी गरम पाणी आणि निवास्थान उपलब्ध आहेत . आम्ही सर्व आटपून देवीच्या दर्शनासाठी आलो. शांत असा देवीचे रूप मनात साठवून घेतले आणि आशीर्वाद घेऊन चिंचणी रेल्वे स्टेशनकडे निघालो. रेल्वे स्टेशनकडे जाण्यासाठी सहा आसनी रिक्षा मंदिरापासूनच आहेत .  

असे रेल्वे स्टेशन पहिल्यांदाच पहिल जिथे फक्त "चिंचणी " असा सांगणारा पिवळा बोर्ड आणि भयाण शांतता. ना  दुकानं, ना फेरीवाल्याची  गर्दी, ना येणाऱ्या जाणाऱ्याची वर्दळ . काही तास वाट पाहिल्यावर बेळगाव ला जाणारी ट्रेन आली आणि  दांडेलीच्या कुतूहलापोटी आमचा प्रवास सुरु झाला . 

दुसऱ्या दिवशी सकाळीच आम्ही बस स्थानकावर आलो. बेळगाव वरून दांडेलीला जाण्यासाठी दिवसभरात काही ठराविक वेळेनंतर बऱ्यापैकी बसेस  उपलब्ध आहेत. साधारण ९  च्या दरम्यान बस पकडून आम्ही दांडेलीला निघालो. बेळगाव शहरातून बाहेर पडल्यावर लहान,स्वच्छ आणि दुतर्फा झाडे असणारे वळणावळणाचे  रस्ते आपल्याला लागतात . बस अनेक लहान मोठी गावे मागे टाकत आपल्याला साधारण ३-३.५ तासानंतर दांडेलीला सोडते. 

आम्ही दांडेलीच्या बस स्थानकावर पोहोचलो.

दांडेली बस स्थानकाच्या आजूबाजूचा परिसर 
फारच कमी वर्दळ, मोकळी,प्रदूषणमुक्त  हवा, हिरवागार निसर्ग,लहान लहान कौलारू घर, लहानश्या टपऱ्या आणि एकाच  मोठा हॉटेल असा हे दांडेलीचे  बस स्थानक. त्या वातावरणात एक वेगळाच सुगंध आणि गारवा होता ,त्यामुळे बुक केलेल्या रेसोर्टवर जायची उत्कटता  अजूनच वाढली . रेसोर्टची गाडी अगदी वेळेत आली. आम्ही समान ठेऊन पुढचा प्रवास सुरु  केला. जसजसा आम्ही रेसोर्टच्या  जवळ जाऊ तसतशी थंडी वाढली, रस्ते आणखीनच जंगलातून जाऊ लागले. दुपारच्या १- २ च्या सुमारास सुद्धा संध्याकाळचा भास होता . हवेतील गारवा अंगाला झोंबत होता आणि साधारण २० मिनिटांनंतर आम्ही रेसोर्ट वर पोहोचलो . शहरातील आपल्या सारख्या लोकांना इतक्या निसर्गरम्य आणि घनदाट वातावरणाची  सवय नसते त्यामुळे  सुरुवातीचा काही काळ मला राहवेना अगदी भूत बंगले वैगरे सारख्या गोष्टी आठवायला लागल्या. रेसोर्ट मध्ये उतरल्यावर माणसांना बघून जीवात जीव आला. रेसोर्टवाल्यांनी  आपुलकीने  आमचे स्वागत केले आणि गरम गरम चहा दिला. एरवी आपण चहा पितो तेव्हा "चहा"या पेयाचे फार महत्व नसते पण थंडीनी गारठून गेल्यावर मात्र घेतलेल्या या चहाची  किमत समजते . चहा आणि गरम गरम कांदा भजी खाऊन आम्ही मस्त फ्रेश झालो आणि त्या वातावरणात रमून गेलो. 


Comments

  1. Khup sundar anubhav khup chan shabdat !!! Bole to ekdam Zakas :)

    ReplyDelete
  2. Layee Bhari!!!!!! Nayan ramya Chinchani dolya samor ubha rahil :)

    ReplyDelete
  3. Soon the kids will be back in school after Diwali ,ITians and consultants are gearing up for a busy fall, the weather will gradually start turning cold (or hot! Hello, Magical Pune!),and we will soon be learning about the exploits of bizarre people on reality television shows of questionable quality. I'm always a bit sad to see Monson go.

    So After reading this blog I thought we could have a week of appreciation for a very special and important person: the writer: Snehal. (And yes, this may mean you.)

    Nearly everyone I've ever met in my entire life has thought at one time or another about writing a Blog. There is a widespread belief that everyone has a Writer in them, that if we could quit our jobs and set aside enough time under a shade tree with a pen and paper we too could be the next J.K. Rowling. How hard could it be, right???

    As anyone who has actually tried to write a Blog like this : it's hard. Really really hard !!!.

    You made the leap of faith, put pen to paper, devoted hours and hours and hours to building a natures world, and after months of hard work and sweat and blood and tears, those of you that finished had something to be rightly proud of: a manuscript of nature.

    Then you find out that the Snehal’s Blog Such Mind Boggling narration of nature.
    Thanks for giving me feel of revisiting all places.

    ReplyDelete

Post a Comment