औरंगाबाद ! ऐतिहासिक शहर !!

प्रत्येक शहराला स्वतःचा असा एक इतिहास असतो आणि त्या इतिहासामुळेच ते शहर प्रसिद्धीस येते. औरंगाबाद ! महाराष्ट्रातील एक ऐतहासिक शहर. २०१२ च्या डिसेंबर  मध्ये  एका लग्नाच्या निमित्ताने
आम्हाला औरंगाबादला जायची संधी मिळाली. पुण्याहून रात्रीच्या गाडीत बसून पहाटेच आम्ही औरंगाबादला पोहचलो. शहराच्या मध्यवर्ती असलेल्या एका हॉटेल मध्ये आम्ही उतरलो . सगळा आटोपून अजिंठ्याची लेणी पाहायला निघालो . शहरापासून ११० किमी अंतरावर असणाऱ्या अजिंठा लेणीकडे जाण्यासाठी अनेक बसेस उपलब्ध आहेत .

आम्ही ८ वाजताची बस पकडली आणि ९ . २० ला अजिंठ्याच्या परिसरात पोहोचलो.  मुख्य प्रवेशद्वारापासून ते लेण्याकडे नेण्यासाठी अंतर्गत बस सेवा उपलब्ध आहेत. बस स्टन्डच्या जवळ अनेक लहान मोठी दुकान आहेत जिथे महिला वर्गाला खरेदी करायला फार आवडेल . तिथे जवळच आपल्याला लेण्याची माहिती देणारा बोर्ड दिसेल.

इथूनच १० मिनिटांच्या अंतरावर लेण्यांकडे जायचा रस्ता लागतो . वाटेतच प्रचंड मोठा असा वटवृक्ष आहे. संध्याकाळी असंख्य पक्षी याच झाडावर किलबिलाट करताना दिसतात . काही पायर्यां चढून गेल्यावर आपल्याल्या एका नजरेतच सर्व लेण्यांचे दर्शन घडते .
वटवृक्ष


अजिंठ्याच्या लेण्यांचे वैशिष्ट  म्हणजे त्या कोणी बांधल्या आहेत याचे गूढ अजूनही उलघडले नाही आहे. लेण्यांमधील कोरीव काम , चित्रकला,रंगकाम , नक्षीकाम अत्यंत मोहक आहे. प्रत्येक लेणीचे काहीतरी विशेष हे आहेच. इथे काम करणारे कर्मचारी त्या त्या लेण्यांमधील माहिती आणि  तिथले वैशिठ्य  सांगतात आणि नेमका आपण काय पहिला पाहिजे हे देखील आपल्याला आवर्जून समजून सांगतात . अनेक लेण्यांमध्ये फोटो काढण्यास मनाई आहे. तेथील कर्मचारी लेण्यांची साफसफाई, स्वच्छता या सारख्या गोष्टींची विशेष काळजी घेताना दिसतात . १ ते १७ लेण्या पाहण्या सारख्या आहेत . प्रत्येक लेणी कशी कोरली असेल ? कोणी कोरली असेल? नेमकी कोणती साधने वापरून इतक सुंदर नक्षीकाम केल असेल?  या सारखे अनेक प्रश्न मनात येतात. पण हे सगळे प्रश्न प्रश्नच राहतात आणि आपण फक्त विचारच करत राहतो. प्रसिद्ध असलेले "पद्मपाणी" आणि "वज्रपाणी" यांची भित्तिचित्रे आपल्याला लेणी १ मध्ये पहावयास मिळतात. आजही या चित्रांमधील चेहऱ्यावरील भाव ,रंग आपल्याला खरे वाटतात. अजिंठा काही लेण्या या  बौद्ध आणि काही जैन  पार्श्वभूमी आधारित आहेत . त्यामुळे काही गुहांमध्ये आपल्याला बुद्ध आणि त्यांच्या जीवनावर आधारित कथा कोरलेल्या दिसतील तर काही गुहांमध्ये जैन धर्मावर आधारित कोरीवकाम पहावयास मिळेल.
पद्मपाणी

वज्रपाणी
सुरुवातीच्या काही गुहांमध्ये आपल्याला भिंतीवर, छतावर  रेखाटलेली आणि सुंदर अशी रंगीबेरंगी चित्रे दिसतील . तिथे असलेले कर्मचारी आपल्याला त्या सर्व चित्रांमधील आशय , भाव आणि गोष्ट सांगतात . माझे असे मत आहे कि या सारख्या ठिकाणांचा इतिहास समजून घेण्यासाठी गाईड ची मदत आवश्यक घ्यावी. तरच आपण या जतन केलेल्या ऐतिहासिक कलेला समजू शकतो.
भित्तिचित्रे 
या रेखाटलेल्या चित्राचे कौतुक करावे तितके थोडेच आहे. इसवीन ४०० च्या दशकात कोरलेली ही  लेणी आणि त्यातील चित्रे या वरील रंगकाम विशेष कौतुकास्पद आहे. निसर्गात उपलब्ध असणाऱ्या पाने, फुले इत्यादीं पासून बनवलेले रंग या चित्रामध्ये जिवंतपणा आणण्याचे काम करतात . एका लेणी मधली "पांढरा हत्ती "आणि त्याची कथा एकण्या सारखी आहे.
पांढरा हत्ती 
३D painting चा शोध पण याच काळात लागला असावा या वर आपला विश्वास बसतो जेव्हा आपण एका चित्रातील राणीच्या गळ्यातील चमकणारा हार  पाहतो. सुंदर असे हे चित्र पाहून अस वाटत कि खरेखुरे मोतीच या ठिकाणी चिटकवलेले आहेत.

अजिंठाचा शोध ज्या गुहेमुळे लागला ती ९ नंबरची गुहा. या सर्व गुहांमध्ये सगळ्यात उंच आणि तितकीच मोठी . खूप सुबक असे नक्षीकाम यावर असून सगळ्यात सुबक  अशी ही  गुहा आहे. या मागची आख्याइका अशी आहे कि, १८१९ मध्ये शिकारीला आलेल्या ब्रिटीश साहेबाने दुरूनच एका वाघाला या गुहेत जाताना पहिला आणि त्या नंतर  नेमका त्या ठिकाणी काय आहे हे पाहण्याची त्याची उस्तुकता वाढली. अत्यंत गर्द अश्या झाडी, झुडपांमध्ये या लेण्या हरवलेल्या होत्या. स्थानिक राजाच्या मदतीने या परिसराची स्वच्छता करण्यात आणि या १ ते १७ लेण्यांचा शोध लागला. पुढे याच लेण्या "अजिंठा" नावाने प्रसिद्ध झाल्या
लेण्यांनच्या प्रवेशद्वारा वरील कोरीवकाम 
९ आणि १० क्रमांकाची लेणी बुद्धा कथेवर आधारित असून बुद्धाची गोष्ट एकण्यासारखी आहे. या गुहेतील झोपलेल्या बुद्धाचे शिल्प प्रचंड मोठे आणि विलोभनीय आहे . बुद्धाने आपला देह त्याग केल्यानंतर पृथ्वी वरील लोकांना झालेले दुखं , त्यांच्या चेहऱ्यावरील दुखद भाव कलाकाराने सुबकपणे कोरले आहेत. तसेच बुद्ध  आता  स्वर्गात येणार म्हणून स्वर्गातील देवांना झालेला आनंद अशी  हि विरोधाभास कलाकृती नक्कीच पहावी .



लेण्या मधील बुद्धाच्या चेहऱ्यावरील शांत भाव पाहून "साधना"म्हणजे नेमका काय ते समजते . विशेष म्हणजे सर्व कलाकृतीवर आपल्याला असेच एकसमान शांत भाव पाहायला मिळतात.
बुद्धाची शांत प्रतिमा 


शेवटच्या याच गुहांमध्ये काही ठिकाणी पहिल्यांदाच वापरलेल्या निळ्या रंगाची कथा देखील तेथिल कर्म चारी अत्यंत आनदाने सांगतात. आजही त्या निळ्या रंगाची गोडी तेथील चित्रामधील फुलांमध्ये उठून दिसते.गुहांमधील छत,भिंती या निळ्या रंगामुळे शुशोभित झालेले आपल्याला दिसतात .  येथील कर्मचारी वर्गाने देखील हे  सगळ व्यवस्थित जतन करून ठेवलेले आहे.
निळा रंग वापरून केलेले सुबक नक्षीकाम




अश्या या अजरामर लेण्या पाहायला १ दिवस पण अपुरा पडतो. साधारण संध्याकाचे ६ वाजले आणि आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. ज्याने कोणी हि कलाकृती, लेण्या , चित्रे  बनवली असेल त्या कलाकारास माझे कोटी कोटी प्रणाम !!

Comments

Post a Comment