जयपूर मधील एक वेगळाच ठिकाण म्हणजे "जंतर मंतर". १७ च्या दशकात दुसरा राजा सवाई जय सिंग याने जंतर मंतर या वास्तुंची निर्मिती केली. जंतर म्हणजे शास्त्र आणि मंतर म्हणजे यंत्र - याचा अर्थ या ठिकाणी आपल्याला विज्ञानावर आधारीत वेगवेगळी यंत्रे पाहायला मिळतात .
 |
| जंतर मंतरचा परिसर |
 |
| जगातील सगळ्यात मोठे घड्याळ |
या यंत्राचा उपयोग खगोलशात्र, ज्योतिषशात्र, राशिभविष्य यांचा अभ्यास करण्यासाठी केला जातो.नेमकी हि यंत्र कशी वापरली जायची या साठी इथे आम्ही गाईड ची मदत घेतली.
 |
| राशी अभ्यास चक्र |
साधारण दुपारच्या वेळेत आपण (सूर्यप्रकाशात) या यंत्रांची किमया पाहू शकतो. जगातील सगळयात मोठं घड्याळ ज्याची नोंद ग्रीनच वर्ल्ड ऑफ रेकॉर्ड मध्ये आहे अश्या घड्याळावर आपण आजही योग्य वेळ पाहू शकतो.
 |
| हवा महल |
सिटी मधले अजून एक पाहण्यासारख ठिकाण म्हणजे हवा महल - अगदी नावाप्रमाणेच
असलेली ही वास्तू. राज घराण्यातील स्त्रिया तेव्हा रस्त्यावर उतरत नसे आणि
राण्यांनाही इतर जनतेने पाहू नये मात्र त्यांना आजूबाजूच सर्व पाहायला
मिळावं या उद्धेशाने या महालाची स्थापना झाली.
 |
| महालाच्या आतील बाजू |
महालाच्या अत्यंत सुबक,खालच्या दिशेने उतरत जाणाऱ्या वेलींप्रमाणे नाजूक नक्षीकाम असलेल्या जाळीच्या खिडक्या खूपच आकर्षक आहे. अजून याची खास गोष्ट म्हणजे नक्षीकाम उतरत्या दिशेने असल्यामुळे महालामध्ये येणारी हवा अत्यंत थंड असते. महालाच्या आतील भागातील खिडक्या आणि दरवाजे रंगीबेरंगी काचांमुळे मोहक दिसतात. महालात येणारी थंड हवेची झुळूक आजही हवीहवीशी वाटते .
 |
| बाजार |
अशी ही सर्व ठिकाणी शहराच्या मध्यवर्ती असून एकमेकांजवळच आहेत. पर्यटनामुळे या परिसरात अनेक बाजारपेठा पाहावयास मिळतात जसे हवा महाल बझार,राजीव गांधी बझार, इंदिरा बझार. बाजारातील दुकानं पाहून पूर्वीच्या बाजारपेठा कशा असतील याची कल्पना येऊन जाते.विविध प्रकारचे जॅकेट्स, मोजड्या, साड्या, बांगड्या यासाठी जयपूर प्रसिद्ध आहे. या शिवाय जयपूरची १०० ग्रॅम वजनाची रजई येथील खास आकर्षण आहे . याशिवाय त्याच दिवशी आम्ही बिर्ला मंदिर, कनक वृंदावन, मोती डुंगरी गणपती ठिकाणांना देखील भेट दिली.
 |
| अल्बर्ट हॉल म्युझिअम |
दुसर्या दिवशी आम्ही आरामात उठून अल्बर्ट हॉल संग्रहालय पाहायला गेलो. लढायांमध्ये वापरली गेलेली विविध प्रकारची शस्त्रे,विविध धातूंमध्ये घडवलेल्या मोठ्या ढाली पाहण्यासारखे आहेत.या शिवाय राजे, महाराज्यांची वस्त्रे ,अलंकार,धातूचीआणि चिनीमातीची दुर्मिळ भांडी, नैसर्गिक रंगामध्ये रंगवलेली चित्रे , पुतळे लक्षणीय आहे
 |
| विविध शस्त्रे |
इथे बघण्यासारखी प्रमुख गोष्ट म्हणजे 'ममी'. ममीचे जतन कसे करतात याची संपूर्ण माहिती इथे मिळते. त्यामुळे दुर्मिळ अशा ममीला भेट देण्यासाठी तरी अल्बर्ट हॉलला आलेच पाहिजे.
 |
| स्वादिष्ट राजस्थानी थाळी |
दुपारीच्या जेवणामध्ये दालबाटीचा आस्वाद घेऊन आम्ही लगेच पुढच्या ठिकाणाकडे वळलो ते म्हणजे 'अमेरचा किल्ला'.
जोधा-अकबर चित्रपटामुळे जास्त प्रसिद्धीस आलेला हा किल्ला. 'अमेरचा किल्ला' - जयपूर सिटी पासून १०-११ किमी अंतरावर असून बस किंवा रिक्षाने इथे जाता येतं (१५,२०रुपये). रस्त्यावरूनच आपल्याला विस्तृत किल्ला सहजच नजरेस पडतो. किल्ल्यामध्ये जाण्यासाठी ३ मार्ग आहेत . १. किल्याच्या मागच्या बाजूने - जर तुमच्याकडे कार असेल तर तुम्ही मागच्या दरवाज्यामध्ये पार्क करून जाऊ शकता. २. फक्त ५० रुपयात
(येऊन जाऊन) - इथल्या रॉयल कार मध्ये बसून तुम्ही किल्यावर पोहचू शकता. ३. साधारण ३०० पायऱ्या चढून देखील किल्यावर पोहचू शकता. किल्ला पाहण्यासाठी आणि त्याचा इतिहास समजून घेण्यासाठी आम्ही गाईडची मदत घेतली (२०० रुपये).
 |
| अमेर किल्ला |
 |
| इलेक्ट्रिक कार |
शीश महल हा किल्यामधला सर्वात सुंदर भाग आहे. राजाने तेव्हाच्या काळी परदेशातून काच मागवून, काचेला आतून चांदीचा तलम चढवून त्याचा वापर इथल्या बांधकामात केला आहे.संध्याकाळी जर इथे मशाली पेटवल्या तर महालाचे छत चमकणाऱ्या काचेमुळे चांदण्यांनी भरून जाते. जे बघताना डोळे दिपून जातात. इथली केसर बाग देखील सुंदर आहे.राजाने इथे केसरीची झाडे लावली मात्र अनुकूल हवामानामुळे त्यांची वाढ झाली नाही. मात्र त्यानंतर देखील या बागेला केसर बाग म्हणूनच ओळखले जाते. या खेरीज इथले रंगकाम देखील थक्क करणारे आहे . काही ठिकाणी तर सोनेरी रंग वापरलेला पाहायला मिळतो. भिंतींवरील रंगकाम - जे अजूनही तसेच आहे कारण इथले रंग नैसर्गिक गोष्टींपासून बनवले आहेत.
 |
| किल्लाच अन्तरभाग |
या खेरीज किल्ल्यामधील दिवाण-ए-आम, दीवान-ए-खास, गणेश पोल, जलेब चौक, सिंघल पोल, जय मंदिर, यश मंदिर, सुख मंदिर, सुहाग मंदिर, शिला देवी मंदिर, भुलभुलाया या सारखी ठिकाण आणि त्यामागचा इतिहास रोमांचक आहे.
 |
| शीश महाल |
 |
| शीश महल |
 |
| हत्ती सफारी |
सकाळी ७ ते १० या वेळात किल्यावर येऊन हत्तीची सफर सुद्धा करू शकता (११०० रुपये ). नाईट टुरिसमला प्रोत्साहन देण्यासाठी इथे लाईट शो देखील केला जातो आणि दिव्याच्या प्रकाशात देखील किल्ला पाहू शकतो.
प्रकाशात उजळून निघालेल्या किल्याला पाहून आम्ही हॉटेलकडे प्रस्थान केल.
Comments
Post a Comment