पुण्याजवळील हॉट "बेबीमून" डेस्टिनेशन्स - भाग १

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो,

माझ्या अनेक मैत्रिणींच्या फर्माईशवरुन ही जरा वेगळी पोस्ट शेअर करत आहे ती म्हणजे पुण्याजवळील "बेबीमून" डेस्टिनेशन्स. या पोस्ट मध्ये नुसतीच ठिकाणच नाही तर ती का खास आहेत कि जेणे करून इथे जाऊन तुम्ही तुमच्या प्रेग्नेंसीमधले दोन एक दिवस का होईना अगदी आरामात आणि प्रसन्नतेत घालवू शकता आणि येणाऱ्या बाळाच्या स्वागतासाठी देखील तयार होऊ शकता ते ही सांगितलं आहे.

आधी समजून घेऊ कि बेबीमून (Babymoon) म्हणजे काय ?

आपण प्रेग्नेंट आहोत हे घरच्यांना समजल कि आपल्यावर अनेक सूचनांचा भडीमार सुरु होतो जी त्यांची स्वाभाविक काळजी असते. काही जणींना मळमळ, उलट्या यांचा त्रास देखील होत असतो. त्यातच सोनोग्राफी आणि दवाखान्याच्या चकरा वाढतात, ऑफिस असेल तर कामाच टेंशन वेगळच  … आणि अजून बराच काही. अशा या सगळ्या दिव्यातून बाहेर पडायला साधारण ७वा-८वा  महिना उजाडतो. मग त्यानंतर घरात डोहाळे जेवणच्या कार्यक्रमाची चर्चा सुरु होते,कार्यक्रमही होतो, आईकडे पाठवणी होते आणि मग बघता बघता डिलिव्हरीही होऊन जाते  ....हुश्श!!! (या सगळ्यातून मीही गेली आहे म्हणून हुश्श केलं.)असो.

ह्या सगळ्या गडबडीत पती- पत्नीना निवांत असा खास  वेळ एकमेकांसाठी म्हणून मिळत नाही. जरी घरात फक्त दोघे असले तरी प्रेग्नेंसी मध्ये असं वाटत राहत कि रोजच्या रुटीनपेक्षा जरा वेगळे क्षण जोडीदारासोबत घालवावे,काहीतरी न  बोलला जाणारा असा बदल हवा हवासा वाटत राहतो. पण एक सत्य सांगू का. हे बदलावाचे क्षण घरात बसून नाही तर घराच्या बाहेर पडूनच अनुभवायला मिळतात आणि मनाच्या कोपऱ्यात आठवणींच छान घर करून जातात.
Babymoon destinations- marathi-blog


तर वाचकांनो, बाळ येण्याच्या आधी तुम्हीला  म्हणजे पती-पत्नींनी काही वेळ एकमेकांसाठी देता यावा , होणाऱ्या बाळाबद्दल मनातलं एकमेकांशी बोलायला मिळाव, पुढील आयुष्याची स्वप्न रंगवायला वेळ मिळावा आणि भावी आयुष्यात होणाऱ्या बदलासाठी आपली 'पालक' म्हणून मानसिक तयारी व्हावी यासाठी म्हणून हे "बेबीमून"!. तर मग या खास क्षणांसाठी ठिकाण देखील खासच असायला हवं नाही का…!!!!

आता मनात येत कि पुण्यात किंवा पुण्याच्या आसपास अशी कोणती ठिकाण आहेत जी बेबीमूनसाठी योग्य असतील? म्हणजे असं ठिकाण कि जे पुण्यापासून जवळही असेल म्हणजे साधारण ५०-६० किलोमीटरच्या  टप्प्यात , मनाला प्रफुल्लित करणार, शांत करणार, निसर्गाच्या सानिध्यात आणि सगळ्यात सगळ्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या बजेटमध्ये देखील. तर अशी १ नाही २ नाही तब्बल ६-१० ठिकाण मी शेअर करणार आहे. माझी आशा आहे कि त्यापैकी एकाला तरी तुम्ही नक्कीच भेट द्याल आणि आयुष्यातील हे खास प्रसंग जतन करून ठेवाल.

एकदम हॉट डेस्टिनेशन्स - बजेट १२०००-१७०००/ रात्र 


सगळ्यात पाहिलं आणि माझ्या आवडतं  - लोणावळ्यातील "द मचाण "!

एकदम सॉलिड असं हे रिसॉर्ट! जिथे आपण पुण्यातल्या जंगलात राहण्याचा आनंद घेऊ शकतो . ५ स्टार कॅटेगरी मधलं हे रिसॉर्ट जरा महाग आहे पण पैसा वसूल करणार सुद्धा आहे. इथल्या रूम्स जंगल फेसिन्ग असून छत,आतलं इंटिरियर,फ्लोरींग लाकडापासून बनवलं आहे त्यामुळे याला एकदम अँटिक आणि ट्री हाऊस फील येतो. आजूबाजुची  गर्द झाडी आणि  कॉटेजेसची रचना भरपूर प्रायव्हसी देणारी आहे. मचाणची खासियत म्हणजे  इथे काही रूम्सला ओपन जंगल फेसिंग बाथटब देखील आहे ,म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात मस्त बाथटब चा अनुभव घेऊ शकता. त्याचप्रमाणे इथे सकाळी योगा सेशन पण होतात आणि स्पा ची देखील चांगली  सोय आहे.
गर्भावस्थेत सकाळी फ्रेश होऊन शांत डोळे मिटून नवर्याच्या कुशीत अंथरुणात पडून राहायचं, उगवत्या सूर्याची कोवळी उन्ह अंगावर घ्यायची,हवेतील गारवा, पक्षांचा किलबिलाट आणि मिठीची उब हे सगळं सगळं जर खुप जवळून अनुभवायचं  असेल तर "द मचाण" नक्की अनुभवा. 

इथे द मचाण  क्लिक करून अधिक माहिती आणि आणखी फोटो पहा. 


ठिकाण २ - मुळशीतील "जलसृष्टी" !!!

नावातच सगळं काही आहे असं हे ठिकाण. एकदम चाबूक!! इथे प्रेग्नेंसी मध्ये तळ्याच्या काठावरील लाकडी, प्रशस्त आणि सुंदर अश्या कॉटेजेस मध्ये  राहायची मजा तुम्ही लुटू शकता . रूम मध्ये बसून तळ्यातील पाण्याचा आनंद लुटायला हे एक परफेक्ट डेस्टिनेशन आहे. इथे २ प्रकारच्या रूम्स आहेत जलका -म्हणजे जे तळ्यालगत आहे तर जलपुष्प- जरा मोठी अशी ही रूम असून ती नदीकाठी आहे. त्यामुळे तुम्ही कुठली रूम बुक करताय त्याप्रमाणे चार्जेस लागू होतात.

रिसॉर्टच एकंदर वातावरण हिवाळ्यात आणि उन्हळ्यात देखील थंडावा देणार आहे.भरपूर मोठा असं परिसर लाभलेलं हे ठिकाण हिरवळीत नटलेलं आहे.  उत्तम,चविष्ट जेवण आणि नाश्त्यासाठी भरपूर वेगवेगळ्या  डिशेस प्रेग्नेंसी मध्ये इथे एन्जॉय करू शकता. इथली खासियत म्हणजे शनिवार आणि रविवारी इथे संगीताच्या बैठकीचा  कार्यक्रम असतो ज्याला आपण "लाईव्ह म्युझिक" म्हणतो . तबला,सतार, बासरीचे सुर यांमुळे वातावरणाला देखील वेगळाच रंग चढतो.  अशा या निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या ठिकाणी मेणबत्तीच्या  मंद प्रकाशात जोडीदारासोबतचे निवांत असे क्षण म्हणजे "दुग्धशर्करा" योगच.

हे ठिकाण म्हणजे फोटोशूटसाठी देखील एक "द परफेक्ट डेस्टिनेशन" आहे असं आपण म्हणू शकतो. नदी, तळ्यातील शांत पाणी ,भरपूर झाडी,इकडे तिकडे बागडणारी बदक बघून मन प्रसन्न होऊन जात.


ठिकाण ३  - "मुळशीचा मुकुट" - डोंगरावरील "मल्हारमाची"

मुळशीचा मानाचा मुकुट असलेलं खास असं हे डोंगरमाथ्यावरील रिसॉर्ट म्हणजे " मल्हारमाची". भरपूर मोठ्या रूम्स आणि मुळाशी परिसर डोंगरमाथ्यावरून सहजच पाहता येईल इतक्या स्थित असलेलं हे ठिकाण.  उंच  उंच डोंगर,मुळशीचे बॅकवॉटर आणि आजूबाजूला भरपूर झाडी रूममधून सहजच नजरेस पडतात. उंचावरअसल्यामुळे थंडीत आणि उन्हाळ्यातही इथला परिसर आल्हादायी वाटतो. अशा या ठिकाणी येऊन तुम्ही निसर्गे सौन्दर्य जास्त जवळून अनुभवू शकता. रिसॉर्टचं लँडस्केपिंग देखील कमालीचं आहे. म्हणजे आपल्यासारख्याना फोटो काढण्यासाठी भरपूर वेगवेगळ्या जागा आहेत. इथल्या जेवणाची चव अस्सल मराठमोळी असून शाकाहारी आणि मांसाहारी लोकांसाठी जेवणात भरपूर पर्याय असतात. त्यामुळे उरलेले सुरलेले डोहाळे देखील इथे  पुरवून घेऊ शकता. 

इथल्या देवराई नावाच्या परिसरात तर नुसता फेरफटका मारताना ,झाडे पाहताना, झाडांना विळखा घालून बसलेल्या वेळी न्याहाळताना २-३ तास  सहजच निघूं जातात. इथल्या निसर्ग रम्य परिरसत मस्त कोमट आणि सुवासिक तेलाच्या स्पाचा अनुभव म्हणजे प्रेग्नेंसीमध्ये -सोने पे सुहागा. तुमच्या नवऱ्याला इथल काही आवडो-  नावडो मात्र प्रशस्त आणि निळाशार असा स्विमिग-पुल मात्र नक्कीच आवडेल. 

हे देखील प्रेग्नेंसी फोटो शूटसाठी उत्तम असं ठिकाण आहे. फक्त जाताना एकतर चांगला फोटोग्राफर किंवा चांगला कॅमेरा घेऊन जा म्हणजे पैसे वसूल.

मल्हारमाची बद्दलची माहिती आणि फोटोसाठी क्लिक करा.

या तीनही ठिकाणी तुम्हाला लहान मोठे सरप्राइसेस पण मिळतात बरं का जसं स्पेशल केक आणि गुलाबाचा बुके, रूम डेकोरेशन, कपल प्रिंटेड फोटो. त्यासाठी रिसॉर्टला भेट देण्याचं खास कारण काय आहे ते बुकिंग करतेवेळी नक्की सांगा आणि घरीयेताना ठवणीं सोबत गिफ्ट देखील घेऊन या. 


या पोस्टमुळे माझ्याही जुन्या आठवणी ताज्या झाल्या... त्यातील  एक टिपलेला क्षण 

पुढच्या पोस्ट ठिकाण मी घेऊन येणार आहेत आणखी ५ डेस्टिनेशन्स . जी आहेत बजेट डेस्टिनेशन्स  ४००० ते ७००० च्या रेंज मधली आणि तीही पुण्यातीलच  बरं का. त्याच प्रमाणे २-३ नवीन कल्पना ज्या या विषयाला घरूनच आहेत जी तुमची  प्रेग्नेंसी आणखीनच यादगार  बनेल. तर मग माझ्या सोबत राहण्यासाठी आणि माझ्या अशा नवनवीन पोस्टसाठी सबक्राइब  करायला विसरू नका. 


तुम्हाला माझी ही  पोस्ट आवडली असेल तर फेसबुक, व्हाट्सअप, गुगल अकाउंटवर शेअर करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत देखील शेअर करा. 

Comments