तुंग फत्ते - कठीणगड ..किल्ला ३
एप्रिल महीन्यात तिकोना सर केला तेव्हाच तुंग मला खुणावत होता🙋. त्याचा भक्कम बांधा, आव्हानात्मक अशी आकाशाला गवसणी घालणारी उंची आणि एकंदर रचना मोहात टाकणारी होती. तिकोना वरून दिसणारा पवना परिसरातील तो एकमेव सुळका एकदम नजरेस पडला आणि डोळ्यात भरला गेला. "तुंग" म्हणजे मावळचा शिरताज - म्हणजेच "कठीणगड".
ऐन उन्हाळ्यात तुंग चढायचं म्हणजे सगळ्यात मोठं आव्हान. त्यामुळे आम्ही पवना धरणाच्या परिसरात आदल्या दिवशी येऊन कॅम्पिंग ⛺करायचं ठरवलं. या वेळी पहिल्यांदाच पाऱ्याने पुणेकरांना ४१ अंशावर नेऊन ठेवलं होतं.अशा वातावरणात स्वानंदीची जास्त चिंता वाटत होती. 🌞उन्हाचे चटके अगदी सकाळच्या नऊ पासूनच जाणवत असल्याने सकाळी लवकरच चढणीला सुरुवात करायची असं आम्ही ठरवलं.
देवाची आणि निसर्गाची कृपा झाली. आदल्या दिवशीच्या संध्याकाळी मस्त ढग भरून आले,थंड वाऱ्याच्या झळा सुखावत होत्या,आकाशात विजांच ⛈ नृत्य चालू होतं आणि बघता बघत एप्रिल मधून एकदम जून मध्ये आल्यासारखं वाटत होत.अवघ्या काही मिनिटांमध्ये निसर्गाने कूस बदलून घेतली🌦🌈 आणि ☔पावसाने हजेरी लावली.
🎪🎪🎪🎪कॅम्पिंग साईडला राहून निसर्गरम्य संध्याकाळचा आणि मनसोक्त पाण्यात डुंबण्याचा आनंद आम्ही घेतला.या वेळी माझे आई बाबा पण सोबत होते. त्यानां देखील या मोकळ्या वातावरणात लईच भारी वाटल.
सुरुवातीच्या पाच सहा पायऱ्या सोडल्या कि संपूर्ण वाट ही खडकाळ भागातून जात होती. मी स्वानंदीला घेऊन दगड -धोंड्यातून पुढे जात होते. मार्ग आणि चढण सुरुवातीपासूनच कठीण होत चाललेले होते. स्वतःला सावरत आणि स्वानंदीला सांभाळत मी पुढे सरकत होते अगदी सावकाशपणे.
या ठिकाणी स्वानंदीला 👶 जरा मोकळं सोडलं… तिलाही बर वाटलं. आमच्या सोबत किल्ला सर करण्याचा आनंद तीही घेत होती.
आता शेवटचा टप्पा मला दिसत होता.ऊन बऱ्यापैकी डोक्यावर चढलं होत.अजूनही किल्याचा शेवट गाठायचा होता. बालेकिल्यावरील भगवा झेंडा वाऱ्यावर डौलाने फडकत होता. अखेरचा टप्पा हा जबरदस्त कठीण आणि आव्हानात्मक होता. या मार्गातून स्वानंदीला घेऊन जाताना माझा कस चांगलाच निघत होता 😓😓😓.तरीदेखील मला तुंगच अखेरचं टोक गाठायचंच होत. डावीकडे खोल दरी आणि उजवीकडे मोठाल्या दगडी हेच या वाटच सौंदर्य म्हणावं लागेल. थांबत थांबत,पाण्याचे घोट घशाखाली उतरवत वर चढले आणि शेवटचं टोक गाठलं.
बाराच्या उन्हात इथे पोहचेपर्यंत माझे देखील चांगलेच बारा वाजले 😭😭😭. मंदिराचा आडोसा घेतला.
सगळा पसारा बाजूला ठेवून डोळे बंद करून देवी मातेचा आशीर्वाद 🙏🙏 घेतला. विश्वास बसत नव्हता की तुंग फत्ते झाला. 👍
या किल्याच्या चढाईचा व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा, लाईक,शेअर आणि माझ्या चॅनेल सबस्क्राईब देखील करा. 👋👋
कधी जावे -उत्तम ऋतु हिवाळा. उन्हळ्यात लवकर म्हणजे सकाळी ६-७ च्या दरम्यान चढाईला सुरुवात करावी. हिम्मत 💪💪 असेल तरच पावसाळ्यात जावे.कसे जाल - पुण्यापासून- पवनानगर - तुंग (जवळची खूण महिंद्रा हॉलिडेच रिसॉर्ट). सोबत लहान मुले असतील तर कार घेऊन जाणे उत्तम.भरपूर दगडी आणि धोकादायक वाट असल्याने लहान मुलांवर जातीने लक्ष देणे गरजेचे. बेबी कॅरियर असेल तर सावकाशपणे बाळाला घेऊन चढावे.
जेवणाची/ राहण्याची सोय - स्वतःचे जेवण सोबत असेल तर उत्तम.पायथ्याला फक्त दोनच खानावळी पण चव उत्तम. किल्यावर खाद्य पदार्थांची विक्री होत नाही. त्यामुळे काहीही खायला मिळत नाही वडापाव पण नाही.जेवणाची ऑर्डर पायथ्याशी असलेल्या हॉटेलमध्ये देऊन जावी. राहण्याची सोय इथे नाही.
सोबत काय घ्यावे - वातावरणानुसार कपडे असावेत.उंची जास्त असल्यामुळे खूप थकल्यासारखं होतं म्हणून सुती आणि सुटसुटीत कपडे असावेत. सोबत १-२ लिटर पाणी आणि डोक्यावर 🤠बाळगणे गरजेचे आहे. किल्यावरच्या कुंडातलं पाणी पिण्या योग्य नाही. खाण्यासाठी ड्रायफ्रुटस, फळे - 🍎🍌 चिक्कू किंवा बोरं सोबत असावीत. लहान मुलांसाठी गुळ-तूप पोळीचा रोल उत्तम.
पार्किंगची सोय - पायथ्याशी भरपूर जागा आहे.
तुम्हाला माझी पोस्ट आवडली असेल तर नक्की फेसबुक,व्हाट्स अप वर शेअर करा आणि खालील कंमेंट बॉक्स मध्ये तुमच्या प्रतिक्रिया देखील कळवा.














👍👍👍👍👍 लय भारी
ReplyDeleteयाला म्हणतात स्वानंद जीवन.....