ट्रेकिंगला निघण्याआधीची पुर्व तयारी भाग १

Hiking
ट्रेकिंगला तर जायचं आहे पण तयारी कशी करू? मुलांसाठी सोबत काय घेऊ? नॅप्पी किती घेऊ?खेळणी घेऊ कि नको ? सगळ्यात महत्वाचं खायला काय घेऊ?
काय मित्र -मैत्रिणींनो अशीच काहीशी अवस्था होते ना जेव्हा ट्रेकिंगला जायचं ठरत. 




काळजी करू नका. चला स्मार्ट होऊयात.. ..

सर्वात आधी मला तुमच अभिनंदन करायला नक्की आवडेल कि तुम्ही सगळे म्हणजे मुलाबाळांसकट ट्रेकिंगला जायचा निर्णय तरी घेतला. आता यामध्ये आपण काही गोष्टी समजून घेऊ कि जेणे करून तुम्ही ट्रेकिंगचा आनंद अगदी मनमुराद लुटू शकता.


काय म्हणताय मानसिक तयारी सुद्धा झाली! व्वा !!

ही सर्वात महत्वाची आणि आनंदाची गोष्ट आहे कि तुम्ही खूप दिवसांनी, अनेक महिन्यांनी किंवा वर्षांनी का यदा कदाचित आयुष्यात प्रथमतःच ट्रेकिंगला जाणार आहात. म्हणजे या निमित्तानी तुम्ही निसर्गात जाणार आहात, त्याच्या विविध रंगी रुपाला जवळून पाहणार आहात. या निर्णयाबद्दल आधी स्वतःच अभिनंदन करा.


ट्रेकिंग म्हणजे काही "रॉकेट सायन्स" नाही किंवा "फक्त काहीच लोकांना जमत बुआ हे असलं. " असं देखील काही नाही. त्यामुळे या भ्रमातून आधी आपण बाहेर यायला हव. निसर्ग सर्वांचा आहे त्यामुळे त्याचा सानिध्याचा आनंद घेण्याचा अधिकार देखील सर्वांचाच आहे. म्हणजे अगदी तान्ह्या बाळापासून ते आजी-आजोबा देखील निसर्गात भटकंतीचा आनंद घेऊन शकता. हो,पण पावलो पावली काही सुरक्षितता आणि काळजी घेणे तितकाच गरजेचे आहे तेही खरं.


म्हणजे काय मानसिक दृष्टीने तयार व्हा! म्हणजे आपोआपच निसर्गात रममाण होऊन जाल.कारण निसर्गात तुम्ही कितीही चाललात, फिरलात,धडपडलात तरी तुम्हाला अगदी खूप थकल्यासारखं वाटणार नाही त्यामुळे आधी आपली मानसिकता बदला.
म्हणूनच आधी स्वतःची मानसिक तयारी करा आणि मनापासून भटकंतीला तयार व्हा.

शाररिक तयारी- स्वतःसाठी काय कराल :

निसर्गात किंवा एखाद्या किल्यावर फिरायचे म्हणजे कमीत कमी ५-६ किलोमीटरची पायपीट करावीच लागते. त्यामुळे रोज साधारण ३-५ किलोमीटर चालायची सवय असावी. अगदीच सवय नसेलच तर आठवडाभर आधी तरी चालणं सुरु करा. कि जेणेकरून ट्रेकच्या दिवशी पाय भरून नाही येणार. इतकी सवय करा कि जेणेकरून थांबत थांबत का होईना पण रोज ४५ मिनिटे तरी चालणं व्हावं.


कोणते कपडे घालावे:

चालताना आपल्याला जे कपडे सोईस्कर म्हणजे सुटसुटीत वाटतील ते घालावे.(माझ्या आईला साडीत सोईस्कर वाटत तर ती साडी घालते,पण ती तितक्याच उत्तमपणे सावरते देखील) ऋतुमानानुसार कपड्यांची निवड असावी. पायघोळ (पायात येणारे) ड्रेस नसावेत कि जेणे करून पाय अडकून पडणार नाही. शक्यतो ट्रॅक पॅण्ट योग्य.
पावसापाण्याच्या दिवसात भटकंतीला छत्री पेक्षा रेनकोट किंवा जॅकेट्स उत्तम.

चालताना पाय घसरणार नाही याची दक्षता घेऊन त्यानुसार योग्य ते सँडल्स किंवा शूज असावेत.शक्यतो पाय पूर्ण बंद राहील याची दक्षता असावी कारण,पायवाटेवर, गवतात लहान सहान किडे,साप, विंचू असण्याची शक्यता असते. पायाला काय झालं तर तुम्हाला कोण उचलून नेणार ? जर तशी व्यक्ती सोबत असेल तर मग......तुम्ही नशीबवान!!



फॅन्सी चपला, उंच टाचेच्या चपला हमखास तुटतातच किंवा बघा काय होतं ते त्यामुळे त्या नकोच च च !!!!.
लहान मुलानं देखील हेच लागू आहे.

मुल सोबत असेल तर काय काळजी घावी / बेबी कॅरिअर कसे निवडावे:

मुल जर ६ महिने ते ४ वर्षा पर्यंतच्या वयोगटातील असेल तर, त्यांच्या वयोमानानुसार आणि वजनानुसार योग्य ते बेबी कॅरिअर घेणे गरजेचे आहे. बाजारात आणि ऑनलाईन बेबी कॅरिअरचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. बेबी कॅरिअर निवडताना -
  • मुलाचे वजन उचलण्याची बेबी कॅरिअरची क्षमता
  • मोजावी लागणारी किंमत
  • त्याचा भविष्यात होणारा  वापर
  • बेबी कॅरिअर कसे हाताळावे याच्या सूचना
या सर्व गोष्टींचा विचार करूनच किंमत मोजावी.कारण मुलांच्या वयोमानानुसार आणि वजनानुसार कॅरिअर कालांतराने देखील बदलावे लागते. (आम्हीतर अनेक बदलली)

जाऊ देत चला- टेंशन नही लेने का रे बाबा!!
एका तर एक मज्जा सांगते,

एक ते दीड वर्षांनी कॅरिअर बदलाव लागत.  

आपले अनेक मित्र-मैत्रिणी असतात की तर मग ते तरी कधी तुम्हाला मदत करणार. अगदी जवळच्या एखाद्या मित्र किंवा मैत्रिणीच्या बाळाचे कॅरिअर घ्या मागून काही दिवसांसाठी. तुमच्या मुलाला त्याची काही दिवस सवय झाली कि घ्या विकत. मुल अगदीच बसायला तयार नाही झालं तर किमान पैसे तरी वाया नाही जाणार हा या मागचा विचार!

खरंतर मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने बेबी कॅरिअरअसणे गरजेचे आहे. कारण काही वेळाने मुलांना कडेवर घेऊन आई असो वा बाबा हात अवघडल्या सारखे होऊ लागते आणि भटकंतीची खरा आनंद हळूहळू यामुळे देखील कमी होऊ लागतो.

आणखी एक महत्वाचं ते म्हणजे - आज बेबी कॅरिअर विकत घेऊन उद्या ट्रेकला निघण्याची चूक करू नका.


ट्रेकला जाण्यापूर्वी एक ते दीड आठवडा आधी पासूनच मुलांना त्यात बसाण्याची सवय लावा.(भाजी आणायला,इकडे तिकडे फेर फटका मारायला घेऊन जाऊन सवय होते) आणि हळूहळू मग त्यांना घेऊन ३-५ किलोमीटर चालण्याची सवय स्वतःला लावा. नाहीतर.... तुम्हीच समजून घ्या काय ते…
तर, भटकंतीसाठी चालण्याची थोडीशी सवय आवश्यक आहे हे सत्य!!

पुढच्या लेखात ट्रेकला जाताना (आबालवृद्धांना) खाण्यासाठी काय काय नेऊ शकतो त्यावर  बोलू.  त्यामुळे संपर्कात राहा.

ट्रेकिंगकडे किंवा भटकंतीकडे बघण्याचा माझा दृष्टीकोन नेमका काय आहे ते जाणून घ्या माझ्या नोकरी + मुल +संसार ...… आणि भटकंती !!  या लेखात. या लेखात तुम्हाला कदाचित तुमच्याच काही प्रश्नांची उत्तरे आणि एक वेगळा विचार करायला नवीन दिशा नक्कीच मिळेल.

हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मैत्रिणींना जरूर शेअर करा आणि खाली कंमेंट बॉक्स मध्ये तुम्हाला हा लेख वाचून काय वाटत आहेत ते देखील कळवा. 



Comments

  1. Aagdi barobar trekking sathi sharirik tya barobar manasik tayari hi atyavashak ahe.

    ReplyDelete
  2. अशी संपूर्ण माहिती आम्हाला कोणीच दिली नाही जे आज तुम्ही एवढ्या सखोल पणे सांगितली खरी ट्रेकिंग ची माहिती आज कळाली खूपच सुंदर Tysm ��☺️��

    ReplyDelete
  3. अशी माहिती आम्हाला याच्या आधी कोणीच सांगितली नव्हती खरी ट्रेकिंग ची माहिती आज कळाली खूपच सुंदर Tysm mam,swachandi ☺️👌

    ReplyDelete
    Replies
    1. Hello Aditya, Its my pleasure,
      yes!! Part 2 nakki wacha

      Delete
    2. Maza naav Snehal aahe bar ka ... manane mi swachandi aahe

      Delete
  4. तुमच्या प्रमाणे मी पण माझ्या मुलाला सह्याद्रीत भटकंतीला घेऊन जात असतो.पण अजुन मुलीला घेऊन गड-किल्यावर घेऊन जाणे झाले नाही. माझी आणि बायकोची इच्छा आहे की तिची सुरवात ही दुर्गदुर्गेश्वर "रायगड " पासुन व्हावी.ती सुरवात या पाडव्याला करायची होती पण निकडीमुळे गेले आठ महीने दिल्लीत अडकलो आहे.पण या निसर्गात केलेल्या भटकंतीचा मुलाच्या जडणघडण, विचार करण्याची क्षमता,चौकसपण,निसर्गाबद्दल ओढ यामध्ये खुपच प्रगती झाली आहे.सगळ्यात महत्त्वाचं आपल्या मुलींच्या अशा स्वच्छंद बागडण्यामुळे तुम्हाला/आम्हाला मिळणारे सुख याला जगात कशाचीच सर नाही येणार.आता मुळ विषयाकडे येतो.तुमच्या मिळालेल्या प्रेरणेने आणि केलेल्या योग्य मार्गदर्शनामुळे नक्कीच बरेच आई-वडील आपल्या मुलांना चार भिंतीत मुक्त करून सह्याद्रीत मुक्त पणे बागडायला घेऊन जातील.यातुनच त्या मुलांच्या आयुष्याला वेगळे वळण लागेल.

    ReplyDelete
  5. तुम्ही माझा लेख वाचला त्यासाठी सगळ्यात आधी तुमचंही आभार. तुमचे मत खूपच आवडलं .. तुम्ही लिहल्याप्रमाणे माझे लिखाण खास वरील नमूद केलेले विचारांचाच आहे.. खूप योग्य लिहाल आहेत तुम्ही.
    धन्यवाद.

    ReplyDelete
  6. खूप छान माहिती.. नवशिक्या लोकांना तसेच ज्यांना इच्छा आहे पण हिम्मत नाही अशांना उपयोगी माहिती...

    ReplyDelete

Post a Comment