मल्हारगड (किल्ला ४) - मराठा साम्राज्यातील शेवटचा बांधलेला किल्ला ...

मे महिन्याच्या एका सकाळी हडपसर मार्गे दिवे घाट गाठला आणि डाव्या हाताला लगेच मल्हारगडचा फलक दिसला. भुईकोट किल्याचा हा प्रकार असून अत्यंत सोपा आणि चढाईला सरळ असा या किल्याच एका वाक्यात वर्णन!
इतिहातील म्हणजे मराठा साम्राज्यात बांधला गेलेला सर्वात शेवटचा किल्ला अशी या किल्याची प्रचिती आहे. त्यामुळे ऐतिहासिक वारसा लाभलेला असा हा किल्ला पुण्याच्या शहरी भागापासून जवळ असल्याने पुणेकरांनी आयुष्यात एकदा ☝ तरी पाहायला काही हरकत नाही.

किल्ला शहरापासून जवळ असल्याने आरामात म्हणजे १०च्या सुमारास आम्ही मल्हारगडाचा पायथा गाठला. अगदी पायथ्यापासूनच किल्याची विस्तृत अशी तटबंदी आणि बुरुज सहजच नजरेस पडला.
किल्ला लहान आणि चढाईस अत्यंत सोपा असल्याने अवघ्या १० ते १५ मिनिटातच स्वानंदीसोबत हा किल्ला चढून झाला.
किल्यामध्ये प्रवेश करण्यासाठी अगदी सुरुवातीलाच चोर दरवाजा लागला. तिथून आत आल्यावर किल्याच्या मुख्य प्रांगणात प्रवेश केला.तिथेच लहान कुंड लागलं. जरासं चालून झाल्यावर वाटेतच मोठी आटलेली विहीर लागली.अगदी कोरडी पडलेली.
उन्हामुळे थकवा जाणवत होता आणि आता नजर झाडाच्या 🌳सावलीच्या शोधात होती. जरा आडोसा घेऊन विश्रांती घ्यावी आणि पाणी प्यावे हाच त्यामागचा विचार. हा भूभाग पर्जन्यछायेच्या पट्टीत येऊन देखील या किल्यावर झाडे नव्हती हे विशेष वाटलं. नुसतंच पठार. या क्षणी मला खऱ्या अर्थाने झाडांची किंमत समजली.
आम्ही गेलो तेव्हा किल्याची नुकतीच या किल्यावर स्वच्छता मोहीम राबवली गेली होती.त्यामुळे अत्ता भेट दिलेल्या किल्यांमध्ये "मल्हारगड" अत्यंत स्वच्छ वाटला. खरं सांगायचं तर या किल्यावर झाडे नव्हती पण स्वच्छते मुळे इथे एक आगळीच प्रसन्नता होती … आणि म्हणूनच कि काय मनाला खूपच बर वाटलं.
आम्ही गेलो तेव्हा किल्याची नुकतीच या किल्यावर स्वच्छता मोहीम राबवली गेली होती.त्यामुळे अत्ता भेट दिलेल्या किल्यांमध्ये "मल्हारगड" अत्यंत स्वच्छ वाटला. खरं सांगायचं तर या किल्यावर झाडे नव्हती पण स्वच्छते मुळे इथे एक आगळीच प्रसन्नता होती … आणि म्हणूनच कि काय मनाला खूपच बर वाटलं.
🌳🌳🌳🌳🌳🌳🌳 यातून प्रेरणा घेऊन आम्ही ठरवलं आहे कि यापुढे भटकंतीला जाताना सोबत फळांच्या बिया (फणस, आंबे, जांभूळ ) न्यायच्या आणि योग्य जागा बघून मातीत पेरायच्या. येणाऱ्या पावसाळ्यात झाडे लावण्याची हि संधी मी तरी सोडणार नाही. 🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
विहीर पाहून झाल्यावर आम्ही अजून एका पटांगणात पोहचलो तिथे खंडोबाचे मंदिर आणि महादेवाचे मंदिर अगदी थाटाने उभे आहे.सुंदर रंगरंगोटी केलेली हि दोनही मंदिरे त्या प्रांगणात अगदी उठून दिसतात.हेच तर आहेत इतिहास पाहिलेले इतिहासाचे साक्षीदार !!
![]() |
| झेंडेवाडी च्या दिशेचा हा दरवाजा. नजर खिळवून टाकणार निसर्ग सौंदर्य इथून पाहायला मिळालं. |
🙏🙏देवाचे दर्शन घेऊन पुढे आम्ही झेंडेवाडीच्या दिशेस असणाऱ्या महादरवाजात पोहचलो. अत्यंत सुंदर अशी दगडी कमान आणि समोरचा निसर्गरम्य परिसरा पाहून क्षणार्धातच आपण यांच्या मोहात पडतो. बराच वेळ थंडगार वाऱ्याचा आनंद लुटत आम्ही तिथेच बसून राहिलो आणि पुन्हा एकदा ताजेतवाने झालो.
दरवाजातुन पुढे चालत गेले असता उजव्या बाजूला किल्याच्या शेवटच्या टप्प्यात घेऊन जाणारी पायवाट नजरेस 👀पडते. या भागात सगळ्या बाजूने सावली होती. थंडावा देखील पुरेपूर होता. त्यामुळे आरामासाठी आणि पेटपूजेसाठी 😋 ही योग्य जागा म्हणून इथेच आम्ही आसरा घेतला.
👶स्वानंदीसाठी ही जागा म्हणजे पर्वणीच! मातीत खेळण्याचं आणि लोळण्याचं ठिकाणच होत… तिने मनसोक्त इथे माती खेळली आणि मीही अडवलं नाही.. ती खेळात मग्न असे पर्यंत आम्ही किल्याच्या मागच्या बाजूस जाऊन बाहेरच्या बाजूने संपूर्ण किल्ला पहिला.
असा हा लहानसा मल्हारगड आरामात पाहण्या करता आम्हाला दोन तास लागले. दुपारच्या बारा वाजेवेपर्यंत आम्ही संपूर्ण गडाला वळसा घालून, चहू बाजुंनी पाहून खाली देखील आलो.
उन्हाळ्यातील दिवसात किल्ला बघणं म्हणजे खरी भटकंती!!
उन्हामुळे गवत आणि झाडे देखील सुकली होती. त्यामुळे उघडे पडलेली बुरुजे, तटबंदी आणि सुकलेल्या पाण्याच्या टाक्या किंवा कुंड अगदी नीट पाहता आल्या. या सर्व गोष्टीचा म्हणजे विहिरी,कुंड,बुरुज संपूर्ण तटबंदी यांच्या लांबी,रुंदी ,खोलीचा खरा प्रत्येय देखील आला.
तर मग वाचकांनो कधी जाताय हा मराठ्यांनी बांधलेला शेवटचा किल्ला पाहायला? आवश्यक जा.
आवश्यक आणि महत्वाची माहिती.
चढण - सोपी
कधी जावे -उत्तम ऋतु पावसाळा ☔. केला लहान असल्याने पावसाळ्यात अगदी लहान मुलांना घेऊन देखील सहज चढता येईल. उन्हाळ्यात लवकर म्हणजे सकाळी ८-९ च्या दरम्यान चढाईला सुरुवात करावी.
कसे जाल - पुण्यापासून- हडपसर- दिवेघाट- मल्हारगड. हडपसर एसटी 🚌स्थानकावरून सासवडला जाणाऱ्या गाडीने फाट्या पर्यंत पोहचू शकता.फाट्यावरून मग दोन ते अडीज किलोमीटर चालत जावे लागते. इथे कुठल्याही प्रकारची शेअर रिक्षा 🚘 किंवा जीप ची सोया नाही.
किल्ला पाहायला लागणारा वेळ - संपूर्ण किल्ला चढून उताऱ्यासाठी २ ⌚तास वेळ पुरेसा.
जेवणाची/ राहण्याची सोय - स्वतःचे जेवण सोबत असेल तर उत्तम.पायथ्याला एक सुद्धा हॉटेल नाही किंवा टपरी देखील नाही. किल्यावर काहीही खायला मिळत नाही कारण इथे कोणीही काहीही विकतच नाही. राहण्याची सोय इथे नाही.
सोबत काय घ्यावे - वातावरणानुसार कपडे असावेत. सुती आणि सुटसुटीत कपडे असावेत. सोबत १-२ लिटर पाणी आणि डोक्यावर टोपी 🤠बाळगणे गरजेचे आहे. खाण्यासाठी ड्रायफ्रुटस, फळे - 🍎🍌 चिक्कू किंवा बोरं सोबत असावीत. लहान मुलांसाठी गुळ-तूप पोळीचा रोल उत्तम.











अजून दोन वर्षात या गडाला आम्ही रायगडासारखा मजबूत करण्याचं स्वप्न बाळगून काम करत आहोत...! येत्या पावसाळ्यात वृक्षारोपण करणार आहोत, अवश्य या...☺️
ReplyDeleteतुमच्या vlogs साठी खूप खूप शुभेच्छा��
हे सगळं वाचल्यावर दोन शब्द टाळक्यात घर करुन गेले. स्वछंदी आणि स्वानंदी. किती महत्वाचं आणि गरजेचं आहे असं जगणं अनुभवणं. एक नंबर.
ReplyDeleteछान शब्दांकन!
ReplyDeleteछान शब्दांकन!
ReplyDelete