प्रवास.. १२ महिने १२ किल्यांचा... प्रवास माझा आणि माझ्या दोन वर्षाच्या चिमुरडीचा
२०१९!!!! काहीतरी भन्नाट घडणार आहे असं वाटतंय....!!!! ! अशी एक (भाकीत) पोस्ट मी फेसबुकवर टाकली होती. आश्चर्य म्हणजे खरोखरच तसंच घडलं हो!
२०१९ माझ्या आयुष्याला एक नवीन दिशा देणारे वर्ष ठरले.
नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सर्वांप्रमाणेच मी देखील स्वहितासाठी,आरोग्यासाठी आणि माझ्या दोन वर्षाच्या मुलीसाठी (सध्या ती पावणे तीन वर्षाची आहे) "मिशन २०१९! १२ महिने १२ किल्ले" ही मोहीम राबवायच ठरवलं.
खरं सांगायचं तर प्रेग्नेंसी नंतरच वाढलेलं वजन कोणकोणत्या प्रकारे कमी करता येईल यांमध्ये काढलेल्या यादीत -"ट्रेकिंगने" ऍक्टिव्हिटीने प्रथम क्रमांक पटकावला. कारण भटकायचं म्हणजे संपूर्ण कुटुंबनिशी भटकता येईल हा त्यामागचा मूळ उद्देश होता.आमच्या आहोंनी देखील या विचारला अगदी सहज होकार दर्शविला त्यामुळे अर्धी लढाई जिंकल्याचा आनंद पदरी पडला आणि ठरलं.
सगळं सांभाळून म्हणजे नोकरी + मुल +संसार ...… आणि भटकंती !! करायची म्हणजे सोपं नव्हतं. पण ठरवलं तर करायचं आणि उत्तमच करायचं त्यामुळे सगळं जुळून आलं.
![]() |
| २०१९ च्या आधी लिस्ट तयार केली होती |
२०१९ जानेवारीमध्ये १२ महिने १२ किल्ले या मोहिमेचा " श्री गणेशा" श्रींच्या दरबारात "श्रींच्या इच्छेने" केला. ते म्हणजे किल्ले रायरेश्वर येथून. प्रारंभी घेतलेल्या शंभूंच्या आशीर्वादाने आम्हाला वर्षभर सतत प्रेरणा मिळत राहिली. ऊर्जेचे आणि शिव-विचारांचे प्रेरणास्थान असलेले हे ठिकाण सर्वानाच २०२० मध्ये देखील प्रेरित करत राहो हीच इच्छा.
![]() |
| रारायरेश्वर पायथ्याला तयारीनिशी |
![]() |
| हिंदवी स्वराज्याच्या इतिहाचा साक्षीदार -रायरेश्वराचे मंदिर |
👇 स्वानंदीला घेऊन सर केलेल्या रायरेश्वराचा प्रवास नेमका कसा होता हे जाणून घेण्यासाठी 👇लिंक वर क्लिक करा. मिशन २०१९ ... किल्ला १.. रायरेश्वर
फेब्रुवारीमध्ये आणि मार्च मध्ये वाढत्या उन्हाचा अंदाज घेतला अन पुण्याजवळ असलेल्या पवना परिसरातील तिकोना आणि तुंग किल्ला सर केला.
![]() |
| तीव्र चढण असलेल्या तिकोना किल्याच्या पायऱ्या |
मिशन २०१९ - किल्ला २ - तिकोना म्हणजे - वितंडगड
तिकोनाचा शेवटचा टप्पा हा माझ्यासाठी सर्वांत कठीण असा होता. साधारण ३०-३५ तीव्र चढण असलेल्या पायऱ्या मला स्वानंदीला घेऊन चढायच्या होत्या. एक आव्हान म्हणून मी ते स्वीकारलं. १०-१५ पायऱ्या चढल्यावरच पायात गोळे आणि मी एकाएकी खालीच बसले. स्वतःच्या शाररीक क्षमतेचा अंदाज मला इथे आला.त्यानंतर मी अधिक जास्त चांगल्यारितीने फिटनेस कडे लक्ष देऊ लागले.
"तुंग" - कठीणगड अगदी नावाप्रमाणेच चढण्यास देखील कठीण वाटला. तुंग चढण्यासाठी नेमकी अशी पायवाट नाही कि न आहेत पायऱ्या. त्यामुळे दगडा-धोंड्यातून 😓😓😓 आपणच आपली वाट ठरवावी आणि त्या वाटेचा अंदाज घेत चढाई करावी असा हा खडतर मार्ग. "तुंग"नेमका कसा आहे हे माझ्या अनुभवातून खास तुमच्यासाठी पुढील लिंकवर अधिक माहिती दिली आहे.तुंग फत्ते - कठीणगड ..किल्ला ३
![]() |
| पहिला दरवाजा- आणि तुंग वरच पहिला 👪फोटो. |
![]() |
| झेंडेवाडी च्या दिशेचा हा दरवाजा. नजर खिळवून टाकणार निसर्ग सौंदर्य इथून पाहायला मिळालं. |
आयुष्यात आणि प्रवासात काय कधी काय प्रसंग येईल काहीही सांगता येणार नाही.. पण अशा स्थितीत न डगमगता पुढे चालत गेले पाहिजे हे मी राजमाची करताना आलेल्या एका अनपेक्षित घटनेतून शिकले.
नेमकं काय घडलं आणि कसं-बस कसं(?) सावरलं हे Yes-आई, you can do it!" या लेखात आवश्यक वाचा.
३० जून २०१९, हा दिवस महिना तर माझ्यासाठी फारच खास होता. यादिवशी आमच्या सोबत (आनंद बनसोडे-एव्हरेस्ट वीर यांच्या सोबत हा ट्रेक आयोजित केला गेला होता) ११-१२ कुटुंब, १२ नवखे ट्रेकर्स आणि चक्क १३ लहान मुलांनी एकत्ररित्या लोहगचा हा पावसाळी ट्रेक यशस्वीरीत्या पूर्ण केला.
| आम्ही सर्वानी मिळून हि मोहीम HeForShe या युनाइटेड नॅशनच्या गोल ला समर्पित केली. |
![]() |
| २०१८ नोव्हेंबर आणि २०१९ जून महिना..याच किल्यावर .. |
त्यानंतर जुलै मध्ये कोल्हापूर गाठलं. स्वराज्यासाठी धारातीर्थ पडलेल्या वीर बाजीप्रभू देशपांडे यांचे स्मारक असलेला आणि आपले प्राण पणाला लावून लढवलेल्या घोडखिंडीचा जिवंत इतिहास म्हणजे -किल्ले "पन्हाळगड " भुईकोट किल्यांमधील हा किल्ला. अत्यंत मोठा आणि थोर असा इतिहास लाभलेला. आजही बाजोप्रभूंच्या स्मारकातून कणखर आणि करारी नेतृत्वाच दर्शन घडते.
| पन्हाळगडावर सुप्रिया आणि तुषार यांच्या समवेत |
ऑगस्ट मध्ये सासवड पासून जवळ असलेला किल्ला पुरंदर गाठला. छत्रपती "संभाजी महाराजांचे" जन्मस्थान आणि "पुरंदरचा तह" या ऐतिहासिक घडामोडींमुळे महत्व प्राप्त झालेला असा किल्ला बराच मोठावाटला . सध्या मिलिटरी च्या ताब्यात असल्या कारणाने किल्यावर जाण्यासाठी स्वतःचे ओळखपत्र दाखवूनच किल्यावर सकाळी ९ ते संध्याकाळी ५ पर्यंत प्रवेश मिळतो.
| पुरंदर किल्यावर चेतन आणि मोनिका बढे समवेत |
कौतुकास्पद बाब म्हणजे श्रावणी (६ वर्ष ) - शर्विल (४ वर्ष) या दोघानींनी संपूर्ण ट्रेक केला. पूर्ण ट्रेकभर तेच आमचे लीडर होते.
![]() |
| आमची गॅंग आणि भावी महाराष्ट्राचे ट्रेकर्स !!! |
![]() |
| पाटण गावातून विसापूरकडे जाण्याचा रस्ता जरा लांबचा आहे पण निसर्ग सौंदर्याने परिपूर्ण देखील आहे. |
चढाई करण्यास अत्यंत अवघड अशा प्रबळगडाने चांगलाच घाम काढला. प्रबळगड चढण्यासाठी आम्हाला दोन तास लागले. केवळ कलावंतिणीच्या रूपाची एक छबी डोळ्यात उतरवण्यासाठी आणि मनात भरून घेण्यासाठी ची ही तरफड अखेर कारणी लागली.
![]() |
| प्रबळगड पाहण्यासाठी तीन तास लागतात. गडावर वाड्याचे अवशेष इतिहासाची आठवण करून देतात. कलावंतीण दुर्गाचे मोहक रूप. |
स्वानंदीने काही पायऱ्यांवर रांगत आणि काही पायऱ्यांवर चढत शेवटचे टोक गाठले तेव्हा मन भरून आलं. आदिनाथ आणि मी निशद्ब होतो. खूपच भावुक असा हा क्षण होता. तेव्हा दिनकर अस्ताला जात होता अन उगवता चंद्र सांगतेची साक्ष देत होता. उपस्थितांना साखर वाटून आनंदात सहभागी करून घेतलं.
![]() |
| कलावंतीनी सर केला. आनंद गगनात मावत नव्हता. उपस्थितांना साखर वाटून आशीर्वाद घेतले. |
रायरेश्वर ते कलावंतानी या बारा किल्यांच्या प्रवासात निसर्ग खूपच जवळून पहिला आणि अनुभवला देखील. अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या या मोहिमेतून ज्या केवळ अनुभवातूनच मिळतात त्या देखील कायमस्वरूपी.
तर मग २०२० च्या मोहिमेत माझ्या सोबत सहभागी व्हा.
किल्ले पाहू आणि भावी पिढीला महाराष्ट्राची ओळख करून देऊ.

















Comments
Post a Comment