BMC बेसिक माउंटेनिरिंग कोर्स म्हणजे काय रे भाऊ?
BMC बेसिक माउंटनिअरिंग कोर्स म्हणजे काय रे भाऊ ?
कुठे करतात? नेमकं काय असत त्यात ?
या सारखे अनेक प्रश्न आणि त्या संदर्भातील माहिती देणारा हा लेख.
१९९९ मधील टायगर हिल च्या लढाईनंतर भारतीय जवानांना सोबत सर्व सामान्य जनतेला देखील माउंटनिअरिंग मध्ये प्रशिक्षित करण्याची गरज मोठ्या प्रमाणात भासू लागली. ही गरज लक्षात घेता हे प्रशिक्षण देणाऱ्या अनेक संस्था भारतात उदयास आल्या.
भारतात स्थापन केलेल्या सर्व माउंटनिअरिंग संस्थांचा उद्धेश एकच आहे, ते म्हणजे भारतातील युवा पिढीला माउंटनिअरिंगसाठी प्रोत्साहन देणे आणि या क्षेत्रात प्राविण्य गिर्यारोहक घडवणे. असा गिर्यारोहक जो जगाच्या पाठीवर भारताचे नाव उज्ज्वल करेल. या प्रशिक्षण केंद्रात केवळ गिर्यारोहण नाही तर आकाशातील साहसी क्रीडाप्रकार (स्काय डायविंग), स्की ,पॅराग्लायडिंग, स्कुबा डायविंग, माउंटन बाईक, राफ्टिंग, सर्च अँड रेस्क्यू या सारख्या विविध साहसी क्रीडा प्रकारात देखील प्रशिक्षण दिले जाते. अर्थात, त्यासाठी काही वयाच्या आणि (शाररीक क्षमतेच्या) फिटनेस बाबत चौकटी आखुन दिल्या गेल्या आहेत.
- माउंटनिअरिंग आणि ट्रेकिंग मधला फरक
माउंटनिअरिंग म्हणजे -बर्फाच्छादित प्रदेशातील भटकंती, बर्फाच्छादित शिखरे चढणे , प्रस्तरारोहण (सुळक्यावंर चढणे), रोप आणि इतर साहित्याचा आधार घेऊन डोंगर-दऱ्यात नवीन मार्ग शोधणे, रॅपलिंग, अवघड श्रेणीतील किल्ले चढणे. या सारखे उपक्रम साहसी प्रकारात मोडले जातात. अशा ठिकाणी शाररिक आणि बौद्धिक क्षमतेची परीक्षा होते.
प्रशिक्षण दरम्यानचा फोटो - स्त्री अथवा पुरुष सो नियम समानच
- हे प्रशिक्षण कोणासाठी आणि कशासाठी?
सह्याद्रीच्या कुशीत असो वा हिमालयात, भटकायच म्हणजे साधी गोष्ट नाही. भटकंतीला देखील अभ्यास लागतो. 'गिरिभ्रमण' हे साहसी क्रीडाप्रकारात मोडणारे प्रकरण आहे हे सर्वानी लक्ष्यात घ्यायला पाहिजे. दऱ्या-खोऱ्यातून भटकायचे म्हणजे जोखिम. येणाऱ्या काळात सुरु राहणारी भटकंती सुखकर आणि सुरक्षित करण्यासाठी आपल्याला अभ्यास आणि पुर्वतयारीचे महत्व समजणे गरजेचे आहे. या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींना भेटले असता असं समजत कि गिर्यारोहण या विषयात दूरपर्यंत मजल मारायची असेल आणि टिकून राहायचं तर काही ठराविक गुण आणि विशिष्ट्य कौशल्य अंगीअसणे गरजेचे आहे. तरच गिरिभ्रमण करताना येणाऱ्या असंख्य अडथळ्यांवर आपण मात करू शकतो. या अडथळ्यांवर मात करायची असेल तर या क्षेत्राचं शास्त्रीय ज्ञान अवगत असणं फार महत्वाचं आहे. म्हणूनच "Basic Mountaineering Course" (BMC ) करणे आवश्यक आहे. त्यानंतर Advance Mountaineering Course(AMC ), मेथड ऑफ इंस्ट्रकशन्स (MOI) , सर्च अँड रेस्क्यू या सारखे प्रशिक्षण टप्याटप्याने घेता येते.
खर तर या अभ्यासक्रमाची गरज ट्रेकर्स , ट्रेक ऑरगॅनिझर, सोलो ट्रॅव्हलर, फोटोग्राफर या सर्वानाच आहे. किंबहुना ज्यांना निसर्गात जायला भटकायला आवडता त्या सर्वांसाठीच आहे. या कोर्से मध्ये आपल्याकडून करवून घेतला जाणारा अभ्यासक्रम सर्वांसाठीच उपयुक्त आहे. अभ्यासक्रमात शिस्त, परिश्रम, सांघिक भावना, शाररिक आणि मानसिक कसोटी यावंर आधारित अशा विषयांचा समावेश असतो.
| आम्ही सर्व- २०१९ सप्टेंबर-ऑक्टोबर बॅच |
- हा कोर्स कधी आणि कुठे घेतला जातो?
- NIM - नेहरू इन्स्टिटयूट ऑफ माउंटनिअरिंग ,उत्तराखंड https://www.nimindia.net/
- NIMAS - नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ माउंटनिअरिंग अँड अलाईड स्पोर्ट्स, अरुणाचल प्रदेश http://nimasdirang.com/Home/
- HMI - हिमालय माउंटनिअरिंग इन्स्टिटयूट, दार्जिलिंग https://hmidarjeeling.com/
- ABHIMAS - अटल बिहारी वाजपेयी इन्स्टिटयूट ऑफ माउंटनिअरिंग अँड अलाईड स्पोर्ट्स अलाईड स्पोर्ट्स, हिमाचल प्रदेश . https://www.adventurehimalaya.org/
- JIM - जवाहर इन्स्टिटयूट ऑफ माउंटनिअरिंग अँड विंटर स्पोर्ट्स, जम्मू-काश्मिर http://www.jawaharinstitutepahalgam.com/
- IHCAE इंडियन हिमालयन सेंटर ऑफ ऍडव्हेन्टचर स्पोर्ट्स अँड इको टुरिझम, सिक्कीम. http://www.ihcaesikkim.org/
- IISM -इंडिया इस्टिटूट ऑफ स्किंग अँड माउंटनिअरिंग , http://www.iismgulmarg.in/ जम्मू-काश्मिर
- SGIM - सोनम ग्यासो माउंटनिअरिंग इन्स्टिटयूट, सिक्कीम
![]() |
| ग्लेशिअर मधला ट्रेनिंग स्पॉट |
वरील इन्स्टिट्यूटची यादी पाहता लक्षात येईल कि या इन्स्टिट्यूट्स हिमालय पर्वत रांगेजवळ असुन यातील एक देखील महाराष्ट्रात नाही. त्यामुळे माउंटनिअरिंगचे प्रशिक्षण जर कोणी देत असेल तर कोण आणि कुठे देत आहे या बद्दल प्रवेश घेताना नक्कीच सर्व बाबींचा विचार करावा.👈
- प्रवेश प्रक्रिया नेमकी कशी असते ?
वर्षातून दोन वेळा म्हणजे एप्रिल-मे आणि ऑगस्ट- सप्टेंबर च्या काळात हे कोर्स घेतले जातात. कमीत कमी ४० आणि जास्तीतजास्त ८०-९० विदयार्थांना दर कालावधीत प्रत्येक इन्स्टिटयूटमध्ये प्रवेश दिला जातो. त्यासाठी -
प्रवेश फॉर्म
रहीवासी दाखला
ओळखपत्राचा दाखला
आधार कार्ड
पॅनकार्ड
फोटो
फी भरल्याचे चलन / पुरावा
फिटनेस सर्टिफिकेट इत्यादी आवश्यक आहे.
काही इन्स्टिटयूट मध्ये मेल पाठवून तर काही ठिकाणी ऑनलाईन पोर्टलद्वारे प्रवेश दिला जातो.
सध्य परिस्थिती पाहता प्रत्येक इन्स्टिटयूट मध्ये कमीतकमी ६ महिने आणि जास्तीत जास्त २ वर्षाचे वेटिंग आहे. म्हणजे तुम्हाला आज अर्ज केलात तर ६ महिने किंवा २ वर्षानंतर प्रवेश मिळतो.
हे प्रशिक्षण देणारे प्रशिक्षक हे सैन्य दलातील अधिकारी असून अनेक वर्ष हिमालयातील वातावरणात रुजलेले दमदार आणि कणखर सैनिकच असतात. त्यामुळे कळत - न कळत एक महिन्याकरिता का होईना आपण देखील भारतीय सैनिकांचे खडतर जीवन काही अंशी अनुभवत असतो.
रहीवासी दाखला
ओळखपत्राचा दाखला
आधार कार्ड
पॅनकार्ड
फोटो
फी भरल्याचे चलन / पुरावा
फिटनेस सर्टिफिकेट इत्यादी आवश्यक आहे.
काही इन्स्टिटयूट मध्ये मेल पाठवून तर काही ठिकाणी ऑनलाईन पोर्टलद्वारे प्रवेश दिला जातो.
सध्य परिस्थिती पाहता प्रत्येक इन्स्टिटयूट मध्ये कमीतकमी ६ महिने आणि जास्तीत जास्त २ वर्षाचे वेटिंग आहे. म्हणजे तुम्हाला आज अर्ज केलात तर ६ महिने किंवा २ वर्षानंतर प्रवेश मिळतो.
हे प्रशिक्षण देणारे प्रशिक्षक हे सैन्य दलातील अधिकारी असून अनेक वर्ष हिमालयातील वातावरणात रुजलेले दमदार आणि कणखर सैनिकच असतात. त्यामुळे कळत - न कळत एक महिन्याकरिता का होईना आपण देखील भारतीय सैनिकांचे खडतर जीवन काही अंशी अनुभवत असतो.
- प्रशिक्षणामधील अभ्यासक्रम
या प्रशिक्षणाचा कालावधी भारतातील प्रशिक्षण केंद्रांत २८ दिवसांचा आहे. सर्वसाधारण ५ किलोमीटर धावणे आणि नंतर कसून शाररिक कसरत यांपासून दिवसाची सुरुवात होते. पहिल्या १०दिवसात प्रशिक्षण केंद्रावर गिर्यारोहणाची माहिती, त्यात वापरण्यात येणाऱ्या सर्व तांत्रिक वस्तू म्हणजेच equipment ची ओळख आणि हाताळणी, या सर्व गोष्टी कशा वापरायच्या, त्याची प्रात्यक्षिके आणि सराव देखील घेतला जातो. यात मुख्यतः रोप आणि त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या नॉट्स व त्यांचा गिर्यारोहणात होणार उपयोग. त्याच सोबत पर्वतारोहण, प्रस्तरारोहण (रॉक क्लाइंबिंग) आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये तग धरुन जिवंत राहणे या कौशल्याची मूलभूत तंत्रे शिकवण्यात येतात आणि त्याविषयीची माहिती आणि अनुभव कथन देखील होते. पर्वतारोहण आणि त्यासंबंधित संबंधित विषयांचे नकाशा वाचन, हवामान अंदाज, प्रथमोपचार प्रशिक्षण आणि चढाईचे धोके यासारख्या विविध बाबी शिकवल्या जातात.
१०-१२ दिवसानंतर सर्व विद्यार्थांना हिमालयातील एखाद्या पर्वतांवर घेऊन जाण्यात येते. जिथे बर्फ आणि बर्फाचे विविध प्रकार दाखवण्यात येतात. तसेच, प्रशिक्षणाची माहिती व प्रात्यक्षिके करून दाखवण्यात येतात. यामध्ये,बर्फाच्या भिंतींवर चढणे, बर्फाचे प्रकार,स्वबचाव यांसारखी वेगवेगळी कौशल्य शिकवली जातात. हि सर्व करामत करण्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे अगदी बॅगेपासून सर्व काही केंद्र पुरवते. त्यामुळे आपल्या सामानाची आणि दिलेल्या वस्तूंची काळजी घेणे व त्या सर्व गोष्टी स्वतः उचलून ६०-७० किलोमीटरचा प्रवास करण्यात खरा कस निघतो.
![]() |
| प्रशिक्षण केंद्रातून मिळालेला नजराणा |
प्रशिक्षणांतर्गत प्राणवायु कमी असलेल्या या ठिकाणी येणारा आरोग्याचा प्रश्न, विशेषत: उच्च उंचींमध्ये (high altitude ) नेमकं काय करायचं, येणाऱ्या शाररिक व्याधींना कसं हाताळायचं, अनिश्चित अडचणी कशा टाळायच्या आणि चढाई यशस्वीरित्या कशी पूर्ण करायची याचा देखील कळत न कळत सराव पडतो जे अत्यंत अत्यंत गरजेचे आहे. हे प्रशिक्षण पुर्ण करताना अति थंडी असो वा बर्फवृष्टी, चांगलाच घाम निघतो खरा.
बर्फातील प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर,असते ती म्हणजे 'परीक्षा'! या दिवशी धमाल असते. रोजच्या पेक्षा वेगळा दिवस कारण, या दिवशी सर्व उद्दीष्टे साध्य करत, शिकवलेली सर्व कौशल्य एकत्रिरीत्या वापरून साधारण १७५०० -१९००० फुट या दरम्यान उंची गाठावी लागते ते देखील लवकरात लवकर. जेव्हा आपण ती ठराविक उंची गाठतो तेव्हा कृतकृत्य झाल्यासारखे वाटते.
![]() |
| टो अँड हीट टेक्निक वापरून बर्फाची भिंत चढावी लागते |
आपली एकंदर प्रगती, परीक्षेतील गुण आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपली २८ दिवसातील वागणूक यांचा आढावा घेऊन अखेर ग्रेड दिली जाते. A ग्रेड मिळालेला विद्यार्थीच फक्त पुढील अभ्यासक्रमासाठी पात्र ठरतो. त्यामुळे पहिल्या दिवसापासूनच स्वतःची वागणूक नीट ठेऊन आणि जे काही शिकवले जाते आहे ते सर्व व्यवस्थितरीत्या ध्यानात घेणे गरजेचे आहे.
- मला हे जमणार का?
हे सर्व आपोआप जमत नसतं त्यासाठी सराव गरजेचा आहे . पाठीवर १५-१८ किलो ओझं घेऊन १४-१५ किलोमीटर चालणे, त्यांत सिंहगड, पर्वती, कात्रज-सिंहगड यांसारखी ठिकाण पादाक्रांत करणे गरजेचे आहे. त्याच बरोबर ५ किलोमीटर पळणे आणि कवायत यांचा ३ महिन्यापासून सराव करणे आवश्यक आहे. वास्तविक स्वरूपात या कोर्सेसमध्ये पर्वतारोहण करणे सोपे काम नाही. प्रशिक्षण केंद्र सर्व काही पुरवते आपल्याला एकाच गोष्ट सोबत न्यावी लागते ती म्हणजे त्या २८ दिवसाचा खडतर कालावधीत तग धरुन राहण्याचा आत्मविश्वास,जिद्द, मानसिक व शाररीक तयारी आणि चिकाटी.
प्रशिक्षण केंद्रात संपूर्ण भारतातून १५- ४५ वयोगटातील विद्यार्थी येतात, १ महिन्यात सर्वांमध्ये सर्वांची चांगली मैत्री होते. प्रत्येक जण कशा न कशात तरी पारंगत असतो. प्रत्येकाचं या प्रशिक्षणाला येण्याचं ध्येय देखील वेगळं असत. या सर्वांनमध्ये एक गोष्टची साम्य असत ते म्हणजे त्यांना साहसी क्षेत्रातच त्यांना पुढे जायचं असतं, त्यातच काम करायच असत. ती कोणती क्षेत्र असू शकतात तर,
ऍडव्हेंचर फोटोग्राफर
प्रोफेशनल ट्रेकर
ट्रॅव्हल गाईड
ट्रॅव्हल ब्लॉगर
माउंटन गाईड
ऍडव्हेंचर टूर ऑपरेटर
ऍडव्हेंचर ट्रॅव्हल रायटर
ऍडव्हेंचर फिल्म मेकर
रेस्क्यू टीम मेंबर ( DMF/ NDRF - डिझास्टर मॅनॅजमेण्ट फोर्स )
यांसारख्या अनेक ...
![]() |
| रंगीबेरंगी टेन्स नी सजलेला आमचा बेस कॅम्प |
- पुढे काय?
महाराष्ट्राच्या सीमेबाहेर, सर्वांपासुन दुर, नवीन लोकांमध्ये, शिस्तीच्या वलयामध्ये हे खडतर दिवस घालवताना आपल्याला आपली एक वेगळीच ओळख होते. स्वतःच्या शाररिक-मानसिक क्षमतेचा खरा- खुरा अंदाज लागतो. विचारसरणी व्यापक होते, दृष्टीकोन बदलतो. २८ दिवसात तासून निघाल्यावर आपण माउंटनिअरिंग मध्ये टिकणार- कि नाही हे सुद्धा स्वतःच स्वतःला समजते. त्यामुळे निकाल काहीही असो पण प्रामाणिकपणे स्वतःच आत्मपरीक्षण करून पुढे काय करायचं यावर नक्कीच विचार करा.
कोर्स दरम्यान ज्या ज्या ठिकाणी जे काही कमी पडले असेल म्हणजे चिकाटी असेल, स्टॅमिना असेल, एखादी लहान-मोठी शाररिक व्याधी उद्भवलेली असेल त्याला ओळखून त्यावर मात करायचा प्रण करा. पुन्हा एखादा नव्या जोशाने, दमाने उभे राहा.
कोर्स करून आल्यावर पुढे जाण्याच्या अनेक वाटा, संधी ज्या या आधी कदाचित अंधुक स्वरूपाच्या असतात त्या आता स्पष्ट दिसायला लागतात. उत्तम श्रेणी आणि प्रमाणपत्र हातात आल्यावर पुढच्या कोर्ससाठी तयारी करायला हरकत नाही. नवीन नवीन लोकांना भेटल्यावर नवनवीन कल्पना, विचार मनात घर करून जातात. या प्रवासात अनेक समविचारी लोकं एकत्ररित आलेले असतात त्यामुळे एखादी नवीन दिशा - कल्पनांचा उदय देखील होतो. तोच विचार अथवा दिशा कदाचित तुमच्या आयुष्यातील एक सुवर्णसंधी देखील असू शकते.. माझ्या मते त्या संधीसाठी तरी पुढे चालत राहावे न थांबता आणि नवीन लोकांना भेटत राहावे,काहीतरी नवीन शोधण्यासाठी, नवीन जगण्यासाठी...
*अत्ता सध्या कोरोना मुळे काही इन्स्टिटयूट मध्ये ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येत आहे. तरी व्यवस्थित माहिती घेऊनच प्रवेश निश्चित करावा.
कोर्स दरम्यान ज्या ज्या ठिकाणी जे काही कमी पडले असेल म्हणजे चिकाटी असेल, स्टॅमिना असेल, एखादी लहान-मोठी शाररिक व्याधी उद्भवलेली असेल त्याला ओळखून त्यावर मात करायचा प्रण करा. पुन्हा एखादा नव्या जोशाने, दमाने उभे राहा.
कोर्स करून आल्यावर पुढे जाण्याच्या अनेक वाटा, संधी ज्या या आधी कदाचित अंधुक स्वरूपाच्या असतात त्या आता स्पष्ट दिसायला लागतात. उत्तम श्रेणी आणि प्रमाणपत्र हातात आल्यावर पुढच्या कोर्ससाठी तयारी करायला हरकत नाही. नवीन नवीन लोकांना भेटल्यावर नवनवीन कल्पना, विचार मनात घर करून जातात. या प्रवासात अनेक समविचारी लोकं एकत्ररित आलेले असतात त्यामुळे एखादी नवीन दिशा - कल्पनांचा उदय देखील होतो. तोच विचार अथवा दिशा कदाचित तुमच्या आयुष्यातील एक सुवर्णसंधी देखील असू शकते.. माझ्या मते त्या संधीसाठी तरी पुढे चालत राहावे न थांबता आणि नवीन लोकांना भेटत राहावे,काहीतरी नवीन शोधण्यासाठी, नवीन जगण्यासाठी...
*अत्ता सध्या कोरोना मुळे काही इन्स्टिटयूट मध्ये ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येत आहे. तरी व्यवस्थित माहिती घेऊनच प्रवेश निश्चित करावा.
- अधिक माहितीसाठी
ज्या विद्यार्थांना बेसिक/ऍडव्हान्स कोर्ससाठी काही अडचणी येत असतील किंवा कोर्स संदर्भात आणखी काही माहिती हवी असल्यास, पिंपरी-चिंचवड माउंटनिअरिंग असोसिएशिअन (PCMA) शी संपर्क करावा. ही संस्था अशा मुला-मुलींना माउंटनिअरिंग कोर्सेससाठी मोफत मार्गदर्शन करते. पिंपरी-चिंचवड माउंटनिअरिंग असोसिएशिअन (PCMA) या संस्थेच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील सुमारे ६५०-७०० विद्यार्थ्यांनी भारतातील विविध प्रशिक्षण केंद्रांमध्ये बेसिक आणि ऍडव्हान्स कोर्सेस केले आहेत.
पिंपरी-चिंचवड माउंटनिअरिंग असोसिएशिअन (PCMA)
pcmaclimbing@gmail.com
७५८८४९२०२०/९०९६४७४२२४
पिंपरी-चिंचवड माउंटनिअरिंग असोसिएशिअन (PCMA)
pcmaclimbing@gmail.com
७५८८४९२०२०/९०९६४७४२२४







भन्नाट!!! माझं sep 2017 ला jim मध्ये झालं बेसिक, b ग्रेड मिळाला त्यामुळे निराशा झाली पण आयुष्याचे सोनेरी दिवस होते ते!!!
ReplyDeleteखरंच.. सोनेरीच दिवस .. नाही जगायला मिळत असं .. निसर्गात.. नवीन लोकांमध्ये.. शिस्तीमध्ये.. साजजिक आहे निराशा वाटते .. पण आज तुम्ही त्या दिवसांना "सोनेरी दिवस" म्हणालात यातच जिंकलं कि सगळं..
ReplyDeleteHappy to know that.. Wish you Good Luck!!!
खूप सुंदर वर्णन केले आहे सगळे व्यवस्थित मांडले आहे ह्या मुळे खूप लोकांना माहिती मिळेल
ReplyDeleteमाझा ही झाला आहे मी माझ्या बॅच चा टॉपर आहे
आणि हे माणसाने करायलाच हवे