डोंगरवाट आडवाटेची आणि त्या वाटेवरचा प्रवास !!
काही ठिकाणांना आणि डोंगरांना नाव नसतात, ना नाव असतात तिथल्या घाटांना!
तिथे अनुभवायच असत अस्तित्व! आनंद घ्यायचा असतो आज त्या क्षणांचा. अशीच ही डोंगरवाट आडवाटेची आणि त्या वाटेवरचा प्रवास !!
सकाळी पुण्यावरून सातच्या दरम्यान आम्ही गाडी काढली. सर्वाना घेत घेत ७. ३० वाजता जुना मुंबई पुणे हायवे पकडला. तिथून पुढे कान्हे फाट्यावरून आत मध्ये गाडी टाकली आणि थेट इंगळून गावांमध्ये थांबली.

साधारण आठ सव्वा आठच्या दरम्यान आम्ही नाष्टा केला. पुढे पुन्हा गाडीमध्ये बसलो आणि आमच्या ऑफ बीट ट्रेकला सुरुवात केली. इंगळून गावामध्ये अनसुदे ही एक पाडी. त्या पडीमधून एक वाट डोंगराकडे जात होती. ती पकडून आम्ही उजव्या हाताकडे चालायला सुरुवात केली. पुढे थेट डोंगराकडे जात असलेला रस्ता दिसतो.
डोंगरावर भिरभिरणाऱ्या पवनचक्क्या एका रांगेत स्वागतासाठी उभ्या होत्या. चालायला सुरुवात केली आणि एका शेततळ्यामध्ये सकाळच्या वेळेस एका मागोमाग एक अशा अनेक म्हशी जलविहाराचा आनंद घेताना दिसल्या.
त्या शेततळ्याच्या बाजूने पुढे डोंगराकडे जाणारा रस्ता आम्ही पकडला.

जसजसं वर जायला लागलो तसतसं इंगळुन गाव आणि धरणाचा परिसर स्पष्टपणे नजरेस दिसत होता. पुढे बैलदरा नावाच्या एका ठिकाणी आम्ही जाऊन पोहोचलो. त्या ठिकाणाहून बैल त्या घळीत म्हणजेच दरीमध्ये पडला म्हणून त्या ठिकाणाचे नाव बैलदरा असे तिथले ग्रामस्थ मानतात. पुढे ती वाट चढत आम्ही झाडीतून डोंगरातून वर चालत राहिलो.

डोंगर पूर्ण संपल्यावर गर्द झाडीतून रस्ता पुढे एका विस्तृत पठारावर जाऊन थांबला. त्या ठिकाणी पवनचक्क्या अगदी नजरेस सहज पडत होत्या. इतक्या मोठ्या पवनचक्क्या जवळून बघण्याचा अनुभव माझ्यासोबत असलेले सहकारी पहिल्यांदाच घेत होते
त्याच वाटेने आम्ही पुढे गेलो तर वाटेमध्ये आम्हाला छोट्याशा पिवळ्या आणि जांभळ्या रंगाची चादर पसरल्याचा भास होत होता. सोनकीची पिवळी आणि जांभळ्या-पांढऱ्या रंगाची फुले चादरीप्रमाणे पसरलेली होती, त्यामुळे मातीचा रंग जांभळट वाटत होता. ते ठिकाण पार केले पुढे भला मोठा रस्ता लागला. वरसुबाई या गावदेवी कडे जाणारा तो रस्ता. आम्ही मुख्य वाटेने न जाता जंगलातून जाण्यात रस्ता पकडला.
.jpeg)
गर्द मोठाली झाडी, शांत परिसर, पक्ष्यांचा चिवचिवाट आणि हलकासा उतरणीचा रस्ता यामुळे आम्ही सर्व खुश होतो. वृक्षांच्या सहवासात उन्हाचा तडाखा अजिबात जाणवत नव्हता. त्या गारव्याचा आनंद घेत आम्ही सावकाशपणे त्या पुढे जात होतो.त्या जंगलात फार मोठी आणि गर्द झाडी पाहायला मिळाली. एक क्षण तर भीमाशंकरच्या जंगलात आल्याचा भास झाला. आजूबाजूला आमच्या शिवाय कुणीही नव्हतं. शांतता आणि प्रसन्नता यांचा वरदान आम्ही अनुभवत होतो.
जंगलातून बाहेर पडलो आणि समोरच आम्हाला केशरी रंगाचं मंदिर दिसलं तेच वरसूबाईचं मंदिर.
मंदिर अत्यंत साध. मंदिराच्या बाहेरच्या बाजूला वरसुबाई या देवीचा भाग असलेली दगडातील एक मूर्ती पाहायला मिळाली. तसेच एकावर एक रचलेला दगडी स्तंभ देखील बघण्यासारखा आहे. तिथे थोडा वेळ विश्रांती घेतली. बॅगमध्ये असलेला पौष्टिक आहार पोटात घातला. आणि अर्ध्या तासानंतर आम्ही पुढे तळ्याच्या दिशेने निघालो.
तळ बघून झाल्यावर आता आम्हाला म्हणजे सर्वांनाच वेध लागले होते ते म्हणजे तिथे असलेल्या पवनचक्की जवळ जाण्याचे आणि पवनचक्की जवळून पाहण्याचे. माझ्यासोबत असलेल्या सर्वांचा पहिलाच अनुभव होता त्यामुळे सगळे खूप उत्साहात होते. इतकी भली मोठी पवन चक्की बघून सगळ्यांचा आनंद द्विगुणित झाला.


तिथे आम्ही अनेक फोटो काढले. आणि आलेल्या वाटेने परतीला निघालो.
लेख आणि फोटो आवडले असल्यास तुमच्या ट्रेक करणाऱ्या मित्र परिवारास आवश्यक शेअर करा.
आमच्या ट्रेक मध्ये सहभागी होण्याकरिता www.gtribe.in या वेबसाईट ला भेट द्या किंवा आमच्याशी संपर्क करा 7588592020 | 7588492020





Comments
Post a Comment