नेतृत्वाचे धडे गड-किल्यांकडून:






एक लीडर म्हणून कधीकधी आपल्याला असा निर्णय घ्यावा लागतो ज्याचा संपूर्ण टीमवर परिणाम होतो. असाच अनुभव मला नुकताच कलावंतीणच्या रात्रीच्या ट्रेक मध्ये आला.(वास्तविकात प्रबळगडचा ट्रेक करायचा होता पण...) आम्ही सर्व १५ जणी प्लॅन A प्रमाणे प्रबळमाचीसाठी निघालो. ट्रेक चालू झाला आणि साधारण तास भर देखील चाललो नसू तर घामाने अंग डबडबयाला लागला.
women trek with Gtribe

 रात्री असली तरी जमीन तापलेलीच होती. सध्याच्या वाढलेल्या तापमानामुळे आम्हाला खूप घाम येऊ लागला. ही गोष्ट आम्हाला अनपेक्षित वाटली.

(रात्री ३.३० वाजता) ट्रेक दरम्यान आमच्या टीम मधल्या एका मैत्रीणीची तब्ब्येत बिघडली. आमच्या एका टीम लीडरसह दोन आणखी लीडर ती बरी होईपर्यंत तिच्यासोबत थांबतील असा निर्णय घेतला. तीच्या प्रकृतीत सुधारणा होईपर्यंत किंवा पुढील निरोप आमच्या पर्यंत येईपर्यंत आम्ही एका ठिकाणी थांबायचे ठरवले. वॉकी वर वेळोवेळी प्रकृतीबद्दल चौकशी होत होती. त्यावेळी हे स्पष्ट झाल कि एक झोप झाल्याशिवाय तिला बरं वाटणार नव्हतं आणि त्यासाठी किमान २ तास देणं गरजेचे आहे. म्हणजे पहाटे पर्यंत आम्हाला तिला सोडून आणि आमच्या ३ लीडर ला सोडून पुढे प्रबळमाचीकडे जाण शक्य नव्हतं. आम्ही एका ठिकाणी थांबून सर्वांचं वाट पाहायची आणि सकाळी प्रबळगड ऐवजी कलावंतीण करण्याच ठरवलं. जो आमचा प्लॅन नव्हता. कारण प्रबळमाची कडे जाण्यासाठी लागणार सगळं वेळ आमचा रेस्ट करण्यात जाणार होता आणि सकाळ झाल्यावर उन्हात प्रबळमाची करण म्हणजे दिव्यच!


अशा परिस्थितीत प्लॅन बदलणे आवश्यक होते. आम्ही कलावंतीण ची निवड केली. चढाई जरी अवघड असली तरी कमी उंची असल्यामुळे कलावंतीण वेळेत होण्यासारखा होत. लीडर म्हणून सरावानं सुरक्षित आणि सर्वात महात्वाचं म्हणजे योग्य वेळेत परत खाली आणण देखील तितकच महत्वाचं होत. उद्भवलेल्या परिस्थितीमुळे हा बदलेल प्लॅन सर्वानी मान्य केला.
सर्वजण या निर्णयाशी सहमत झाल्या. कारण आम्ही आमच्या मागे राहिलेल्या मैत्रिणीला एकटी सोडून जाऊ शकत नव्हतो, आम्हाला तिला सोबत घेऊन पुढे जायचं होत किंवा एका सुरक्षित ठिकाणी पोहचवायचं होता. 

climbing kalavantin gtribe women batch  

गेल्या सहा ट्रेक चा अनुभव या सर्व महिला ट्रेकर्स ला असल्यामुळे आता आपल्या स्वतःची ओळख नव्याने देखील झाली होती. म्हणजे त्यांना देखील हे जाणवायला लागला कि शरीराचं कुठे ऐकलं पाहिजे आणि मनाचं  कुठे ऐकायला पाहिजे. 

सकाळी ५.३०~ ६ वाजता सर्वांचा बऱ्यापैकी आराम झाला होता. झोपल्यानंतर आमची मैत्रीण देखील ताजी तवानी आणि बरी झाली. एका झोपेमुळे किती चमत्कार घडला काय सांगू?  साधारण सकाळी ७ पर्यंत आमचे लीडर आणि मैत्रीण देखील वाट पाहत असलेल्या ठिकाणी येऊन पोहोचली. सर्वांना मनापासून खूप आनंद झाला. टीम पूर्ण झाली. 

आराम आणि नाष्ट्या नंतर आम्ही सर्वजण पुढील आव्हानाला सामोरे जाण्यास सज्ज  झालो.  कलावंतिणकडे निघालो. चढाई चांगलीच अंगावर येणारी होती. झाडा झुडपांच्या सावल्या मधून जाणारी चढण मागे टाकत साधारण २० मिनिटात आम्ही पायथ्याला पोहचलो. एकामागे एक असं करत सर जणी पायऱ्या चढू (रांगतच चढत होतो) लागल्या. शेवटी वर पोहोचण्यासाठी ८-९ फूटची रोप च्या साहाय्याने थोडीशी चढाई करावी लागली. 


सर्व महिलांनी अतिशय शांतपणे आणि सर्व बळ एकवटून बरीच हिम्मत दाखवली. माझ्यामते हे सर्व त्यांच्या इच्छाशक्तीच्या जोरावर झालं. सर्वच्या सर्व जणी महाराज्यांच्या मूर्ती पर्यंत पोहचल्या. सर्वांच्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू होत आणि डोळ्यात स्वतःबद्दलच कौतुक ! या मुळे चेहऱ्यावर इतकं ट्रेक करूनही कुठेही रडवेला पणा किंवा दमछाक नव्हती.



महाराजांचा जय जयकार करून आणि तो आनंदी क्षण कॅप्टचर केला. सर्व महिलांना खूपच आनंद झाला होता कारण त्यांनी महाराष्ट्रातील कठीण ट्रेक पैकी एक ट्रेक यशस्वीपणे पूर्ण केला होता.

अनेकांनी उंचीच्या भीतीवर मात केली होती. आयुष्यात पहिल्यांदाच ८-९ फुटांचं कलाइम्बिंग देखील सर्वांनी  प्रथमच केलं. यामुळे उंचीची भीती दूरहोण्यास  मदत झाली आणि साहस करताना कोणत्या पातळीपर्यंत सुरक्षितता बाळगली पाहिजे हे सर्वजणी काळात न काळात शिकल्या. तसेच, योग्य ती काळजी घेतली कि असे साहसी क्रिडा प्रकार मला जमू शकतात यावर सर्वाना विश्वास बसला. 

 
चढाई करताना कोणालाही खरचट नाही किंवा जखम झाली नाही हे देखील तितकच नमूद कारावस वाटत.

आता पुढे आणखी दोन आव्हान होती. सर्वानासुळक्या वरून खाली उतरवायचं होत. अगदी सावकाशपणे आणि सुरक्षितता बाळगून, योग्य ती काळजी घेऊन सर्व नीट खाली आल्या. ट्रेक तेव्हाच यशस्वी होतो जेव्हा सर्व जण सुरक्षित घरी पोहचतात आणि आम्ही त्यात सर्वजण यशस्वी झालो!

एकूण ट्रेक १४ किलोमीटर च्या आसपास , पेक्षा जास्त होता पण उंची सुमारे २०००+ मीटर होती. 
हा ट्रेक म्हणजे टीमवर्क आणि इच्छाशक्ती चे उत्तम उदाहरण म्हणून आयुष्यभर मला प्रेरित करत राहील.


लेख आणि फोटो आवडले असल्यास तुमच्या ट्रेक करणाऱ्या मित्र परिवारास आवश्यक शेअर करा.आमच्या ट्रेक मध्ये सहभागी होण्याकरिता www.gtribe.in या वेबसाईट ला भेट द्या किंवा आमच्याशी संपर्क करा 7588592020 | 7588492020

बेसिक माउंटेनिअरिंग कोर्से नेमका असा असतो? त्या बद्दल जाणून घेण्यासाठी हा लेख आवश्यक वाचा. BMC म्हणजे काय रे भाऊ?

 




Comments