नेतृत्वाचे धडे गड-किल्यांकडून:
एक लीडर म्हणून कधीकधी आपल्याला असा निर्णय घ्यावा लागतो ज्याचा संपूर्ण टीमवर परिणाम होतो. असाच अनुभव मला नुकताच कलावंतीणच्या रात्रीच्या ट्रेक मध्ये आला.(वास्तविकात प्रबळगडचा ट्रेक करायचा होता पण...) आम्ही सर्व १५ जणी प्लॅन A प्रमाणे प्रबळमाचीसाठी निघालो. ट्रेक चालू झाला आणि साधारण तास भर देखील चाललो नसू तर घामाने अंग डबडबयाला लागला. रात्री असली तरी जमीन तापलेलीच होती. सध्याच्या वाढलेल्या तापमानामुळे आम्हाला खूप घाम येऊ लागला. ही गोष्ट आम्हाला अनपेक्षित वाटली. (रात्री ३.३० वाजता) ट्रेक दरम्यान आमच्या टीम मधल्या एका मैत्रीणीची तब्ब्येत बिघडली. आमच्या एका टीम लीडरसह दोन आणखी लीडर ती बरी होईपर्यंत तिच्यासोबत थांबतील असा निर्णय घेतला. तीच्या प्रकृतीत सुधारणा होईपर्यंत किंवा पुढील निरोप आमच्या पर्यंत येईपर्यंत आम्ही एका ठिकाणी थांबायचे ठरवले. वॉकी वर वेळोवेळी प्रकृतीबद्दल चौकशी होत होती. त्यावेळी हे स्पष्ट झाल कि एक झोप झाल्याशिवाय तिला बरं वाटणार नव्हतं आणि त्यासाठी किमान २ तास देणं गरजेचे आहे. म्हणजे पहाटे पर्यंत आम्हाला तिला सोडून आणि आमच्या ३ लीडर ला सोडून पुढे प्रबळमाचीकडे जाण...
.png)

.png)
