राजमाची ! चढला तो जिंकला !!!
जून महिना आला कि कागदावर माझी लिस्ट तयार होते. ती म्हणजे या पावसाळ्यात फिरायला कुठे कुठे जायच याची . त्यातील माझा एक आवडत ठिकाण ते म्हणजे "राजमाची", हे माझच नाही तर पुणेकरांचा आवडत ठिकाण आहे . राजमाची म्हणजे पुणेकरांचा typical trekking destination. वर्षातून २ वेळा म्हणजे पावसाळ्यात आणि हिवाळ्यात भेट देऊ शकता असा हा निसर्गरम्य राजमाचीचा पट्टा. दोन्ही ऋतूत या ठिकाणाच सौंदर्य ते वेगळाच. ठिकाण जरी एक असल तरी ऋतू नुसार त्यात नाविन्य असत.
पावसाळ्यातील राजमाचीचे वर्णन करावे कितके कमीच आहे . आम्ही मागच्या वर्षी पावसाळ्यातच राजमाचीला गेलो होतो . साधारण लोनावाल्या पासून १५ किलोमीटरवर असून काही अंतरापर्यंत आम्ही गाडीने जाऊ शकलो. इथे मिळेल त्या जागी स्वतःची गाडी स्वतःच्या जबाबदारीवर पार्क करूनच पुढे जावे लागते . राजमाची ट्रेक ३ प्रकारे करता येतो .१. वाटेत असणाऱ्या तुंगार्ली धरणाच्या काठावर (back water) संध्याकाळी पोहचावे . रात्री तिथेच तंबू ठोकून मस्त तळ्याकाठी कॅम्पिंग करून सकाळी राजमाचीकडे प्रस्थान करवे.
| तुंगार्ली चा परिसर |
![]() |
| डोंगरावरून दिसणार्या धरणाचे दृश |
३. एक दिवसाच्या परतीचा प्रवास.
आम्ही सकाळी लवकरच लोणावळ्याला पोहोचलो . लोणावळ्यातील HDFC बँकेलगतचाच रस्ता आपल्याला राजमचीकडे नेतो त्यामुळे आम्ही ही तोच रस्ता पकडला. रस्त्यावरील दगड- धोंडे ,खड्डे ,चढ -उतार याची मज्जा लुटत साधारण ५ किलोमीटर अंतर गाडीनेच पार केले. जाता जाताच डोंगराच्या कुशीत वसलेले लोणावळा शहर नजरेस पडले. सुंदर ,टूमदार असे बंगले आपल लक्ष्य वेधून घेतात.काही वेळ का होईना पण आंम्ही सगळे बंगले आपण नीट पहिले.
![]() |
| लोणावळा शहर आणि सुंदर बंगले |
पुढे अंदाजे पाऊन तास आपल्याला लहान पायवाटेवरून जाव लागत. एकीकडे दरी आणि दुसरीकडे डोंगर अशी हि वाट. पुढे लगेचच फार सुंदर रमणीय अस चित्र होत. दोन्ही बाजूला उंच डोंगर, त्यावरून खाली जमिनीवर वाहत येणारे लहान- मोठे धबधबे आपल्याला वेगळ्याच जगात घेऊन जातात .
हि सुद्धा कॅम्पिंग करण्यायोग्य अशी जागा आहे. याच रस्त्यांनी पुढे राजमाचीकडे जाता येते. काही अंतर चालून गेल्यावर आम्हाला राजमचीकडे जाण्याची योग्य दिशा दाखवणारा बोर्ड दिसला आणि आमच्या जीवात जीव आला.
![]() |
| दिशा दाखवणारा बोर्ड |
![]() |
| ओहोळ |
विलोभनीय असा दृश पाहून काही क्षण का होईना पण मला तरी स्वतःचा विसर पडला. खूप दूर आणि आकाराने मोठ्या असणार्या या धबधब्याचा आवाज कानाला खूप गोड वाटत होता . आपल्या दुर्देवाने आपल्याला धबधब्यात उतरण्याची सोय नाही. संपूर्ण प्रवासात इथ पर्यंत कुठेही चहाची टपरी नाही . हा नजरा पाहता पाहता चहा आणि कोळशावर भाजलेल कोवळ कणीस खाण्याची मज्जा ही औरच!. एक गोष्ट मला इथे आवर्जून नमूद करावीशी वाटते ते म्हणजे इथे मिळणारा चहा हा फक्त ५ रुपयांचा आहे. रोज इतके अंतर पार करून , पडणाऱ्या रपरप पावसाचा मारा सहन करून देखील इथले स्थानिक लोक दुर्गप्रेमींसाठी अगदी योग्य माफक किमतीत चहा उपलब्ध करून देतात आणि आपला उदरनिर्वाह चालवतात . खरंच कौतुक करण्यासारख आहे हे सार .
हिरवेगार डोंगर आणि कोसळणारा धबधबा असा हे नयनरम्य दृश आपल्याला राजमाचीवर जाईपर्यंत दिसत राहत. जाता जाता आपल्याला अनेक विविध रंगी पक्षी ,फुलपाखरे आणि माकड सुद्धा पाहायला मिळतात. आपल्यासारखच
ती सुद्धा वर्षाविहाराचा आनंद घेत असतात. वाऱ्यावर उडत असतात ,डोलत असतात ,येणाऱ्या-जाणार्याचे स्वागत पण करत असतात . पावसात गारठून गेलेल्या माकडांचा असाच एक सुंदर क्लिक मला इथे मिळाला .साधारण २०-२५ मिनिटांमध्ये आम्ही राजमाचीच्या पायथ्याला पोहोचलो. तिथे भैरोबाचे लहान मंदिर आहे . रात्री मुक्कामाची वेळ आलीच तर या मंदिराच्या आडोश्याला तुम्ही विसावा घेऊ शकता . मंदिराच्या समोरच्याच बाजूला दोन दिपस्थंभ आहेत. अनेक उन्हाळे ,पावसाळे सहन केल्यामुळे त्यांची आता झीज झाली आहे . तसेच काही लहान दगडी मुर्त्या भग्नावस्थेत आहेत .
![]() |
| दिपस्तंभ आणि काही मूर्तीचे अवशेष |
![]() |
| राजमाची |
गडावर अनेक लहान-मोठी डबकी आहेत. कधी गेलात तर डबक्यात पाय टाकून आवश्यक बसा . डबक्यातील छोटे छोटे मासे पायाला गुदगुल्या करून जातात. या प्रकाराला "Fish Therapy म्हणतात .फारच मजेशीर असा अनुभव असतो . त्यामुळे कि काय पण थकवा जरा कमी व्हायला मदत झाली होती .थोडा पुढे चालून गेल्यावर मागे वळून पहिल तेव्हा कोसळणारा धबधबा आणखीनच सुंदर दिसत होता. येणारे- जाणारे पावसाचे ढग त्याच्या सौंदर्यात आणखीनच भर घालत होते. मी तर ढगातच होते. अनुभवत होते निसर्ग, वारा आणि त्यातील गारवा .
चोहुबाजुकडे पसरलेली हिरवळ आणि त्यात पावसात भिजलेली ,काळ्याकुट्ट दगडांची राजमाची नुसताच बघत बसावे असा हे दिमाखदार रुप. खरच हे सार बघुन तुम्हाला सुद्धा जिंकल्यासारख वाटेल.
वातावारातील थंडावा आणि उत्साह यामुळे १५ किलोमीटर अंतर चालून देखील आपल्याला थकवा जाणवत नाही कारण निसर्ग वेळोवेळी आपली काळजी घेत असतो. जरावेळ आराम करून , जेवून , इकडे तिकडे फिरून आम्ही परतीचा मार्ग धरला . इच्छा नसताना सुद्धा परतावे लागत होते म्हणून माझ मन जरा नाराज होत . मी मागे वळून स्वतःशी ठरवल कि पुढच्या वर्षी सुद्धा नक्कीच येणार भेट द्यायला.














I will like to visit Rajmachi..
ReplyDelete