बालदिन....आनंदी आनंद गडे .. इकडे तिकडे चोहीकडे!!

"आमची मुलं आज अगदी एका हाकेतच उठली". "आज तर मागे न लागता स्वतःच स्वतः आवरल सुद्धा". मुले आज न उठवता उठणारच होती. कारण आज ते नवीन विश्वात जाणार होती .. राजमाचीच्या जंगलात ..!!🌄

१७ नोव्हेंबर चा दिवस १०-१२ वर्षांच्या मुलांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी काही खासच होता. आज आम्ही वेगळी दुनिया पाहण्यासाठी आणि निसर्ग अनुभवण्यासाठी लोणावळ्यापासून जवळ असलेल्या राजमाचीच्या जंगलात "भटकंतीला"निघालो होतो.

३६० एक्सप्लोरर सोबत बालदिन साजरा करण्यात आला

सकाळची ६.३० ची 🚆🚆🚆पकडून ८ वाजता आम्ही सर्वजण लोणावळ्यात उतरलो. अनेक मुला-मुलींच्या आयुष्यातील ट्रेन चा हा पहिलाच प्रवास. तो देखील आई- बाबांशिवाय! या अनुभवाची आणि आगळ्या-वेगळ्या प्रवासाची चमक त्या क्षणी त्यांच्या 👀अगदी लक्ख दिसत होती.

आम्हाला या मुलांसोबत संपूर्ण दिवस घालवायचा होता. त्त्यामुळे आम्हाला सगळ्यात आधी त्यांचे मित्र बनायचं होत.त्यांचं मन देखील जिंकायची होत. ही सर्व मुले पुण्यातील विविध भागातून आली होती. सर्वांची एकमेकांसीबत इतकी छान गट्टी झाली कि जणूकाही ते कधी अनोळखी नव्हतेच.👍👍 (अशा प्रकारच्या ग्रुप ऍक्टिव्हिटीमुळे मुले नवीन मित्र करायला शिकतात )
परिचय कार्यक्रम.
एकमेकांची ओळख आणि आवडी-निवडीचा परिचय करून घेऊन आम्ही नाष्ट्यावर🍞🍌🍷 ताव मारला. मोकळं रान, सकाळची ताजी, स्वच्छ हवा आणि हवेतील गारवा यामुळे भल्या पहाटे लवकर उठून देखील सर्वजण प्रसन्न दिसत होते. या ग्रुप मधील बहुतांशी मुले निर्सगाच्या सानिध्यात (ट्रेककिंगला देखील) पहिल्यांदाच आलेली होती. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य,डोळ्यातील कुतुहूल पाहण्याजोग होत. मोकळ्या रानवाटा त्यांना साद घालत होत्या. नास्ता झाल्यावर पुढे जंगलात जाण्याची घाई सर्वांमध्ये दिसू लागली. आम्हीला देखील त्यांच्या भावविश्वात रममाण व्हायचं होत त्यामुळे आम्ही देखील जास्त वेळ न घालवतात जंगलाकडे निघालो.
👪आई-बाबा सोबत नसताना स्वतःची काळजी स्वतः घेणे आणि शिस्त बाळगणे या महत्वाच्या गोंष्टी  मुले त्यांच्या वागणुकीतून दाखवत होती. जंगलाच्या मोकळ्या वाटेवर गप्पा टप्पा करत ,जंगलाचा आनंद घेत सगळे पुढे जात होती. "अरे पाण्याची बाटली घेतलीस का" ? "काय रे टोपी का नाही घातलीस?" या सारखी काळजीवाहू  वाक्य सतत कानावर पडत होती. आपल्या मित्राने आजारी पडू नये आणि माझ्या इतकच मनमुराद आनंद माझ्या मित्र -मैत्रिणींनी देखील घ्यावा अशी प्रत्येकाची आपुलकीची भावना होती ! (सांघिक कृती<ग्रुप ऍक्टिव्हिटी > आपल्याला जास्त मृदु बनवतात आणि एकमेकांबद्दल आपुलकी,प्रेम निर्माण करायला आपोआपच शिकवतात )

साधारण दीड किलोमीटर चालून गेल्यावर आम्ही एका पठारावर पोहचलो. डोंगर ,दरी, सृष्टी सौंदर्य,उंच डोंगरांगा आणि राजमाचीचा बालेकिल्ला या ठिकाणाहून अगदी सहजच खुलून दिसत होता.




आम्ही सारे म्हणजे अगदी लहान मोठे सगळेच जण त्या ठिकाणी निसर्गाचं सौंदर्य न्हाहाळतच बसलो. बराच वेळ या ठिकाणी थांबून फोटो काढले. सावलीत बसून पाणी प्यायलं. राधाने आईने बनवून दिलेला लुसलुशीत केक 🥮 सर्वाना वाटला.सगळ्यांनी त्यावर मस्त ताव मारला. जराशी विश्रांती घेऊन परत आम्ही पुढील टप्याकडे निघालो. केकमूळे कि काय पण मुलांमध्ये वेगळीच ऊर्जा संचारली होती कारण आता त्यांना मनसोक्तपणे पाण्यात डुंबायचं होत, चिंब व्हायचं होत आणि प्रत्येकालाच खूप मज्जा देखील करायची होती.

काही अंतरावरच एक लहानसा ओहोळ आमची वाट पाहत होता. निर्मनुष्य असा हा ओहळ पाहून मुले तर अगदी सैरवैर झाली. सगळ्यात आधी कोण कोणाला भिज़वत यात त्यांची स्पर्धा सुरु झाली.

सवंगड्यांसोबत पाण्यात बेभान झालेली मुले

नितळ,स्वच्छ आणि सुरक्षित पाण्याच्या प्रवाहात सगळे अगदी आनंदाने खेळत होते. आजच्या दिवशी मुलांना निसर्गाच्या कुशीत मनसोक्त 🦋🦋🦋🦋🦋 बागडताना पाहून खरंच एक वेगळाच समाधान लाभलं.
थंड पाण्यात मनमुराद खेळून झाल्यावर काहीजण मित्रांसोबत शांत वातावरणाचा आनंद घेत होते तर काही आपल्या पालकांसोबत उन्हात उब अनुभवत होते 🌞🌞.
आमच्या सोबत आलेल्या झेक रिपब्लीक देशातील एका कुटुंबाने देखील महाराष्ट्राच्या या निसर्गाचा मनोसोक्त आनंद घेतला. त्यांची मुले आणि दाम्पत्य देखील सर्व मुलांसोबत,आमच्यासोबत अगदी सहज रमून गेले होते.

बघता बघता एका तासाच्या वर आम्ही पाण्यातच होतो. मुले पाण्यातून बाहेर यायला तयार नव्हती.


डोक्यावर 🌞🌞वाढत होते. जंगलाच्या त्याच वाटेने परत फिरून आम्ही एका आडोशाला निवांत झालो आणि चविष्ट 😋😋जेवणावर हात मारला. मुले देखील खूप थकली 😰 होती.. तरीदेखील जेवण करून परत पुढच्या ऍक्टिव्हिटीसाठी जोमाने तयार झाली.

रुचकर,चवदार जेवण!! 😜😜😜

आता मात्र सर्वांच्या आवडीचा कार्यक्रम होता.तुडुंब जेवण करून मुले पुढच्या आव्हानाला तयार झाली होती. त्यांना 🖉🖉 शिवाय फक्त 🎨🎨चित्र रेखाटायचं होत. विषयाचं बंधन नव्हत. त्यामुळे निसर्गातील अनेक गोष्टी म्हणजे पान, गवत ,दगडी.दोरे घेऊन मुलांनी आश्चर्य करायला लावणाऱ्या कलाकृती कागदावर रेखाटल्या. लहान मुले किती वेगळा विचार करतात आणि त्यांची ती कल्पनाशक्ती किती वेगवेगळ्या किमया घडवून आणतात याची उत्तम उदाहरणे या ठिकाणी पाहायला मिळाल. 😍😍😍
नेमकं काय करू? कसं करू? काय काढू? या विचारात मग्न असलेला दर्श. तर एकीकडे सोनाली आणि राणूने उत्तम चित्र काढून बक्षीस
पटकावले. बारबोरा तिच्या मुलांना प्रोत्साहन देताना.


सगळ्यांची चित्रं पूर्ण झाल्यावर आम्ही थक्क झालो. कारण सगळी चित्रे खूप सुंदर आणि अविष्कारांनी परिपूर्ण होती.
स्वतःच चित्र कौतुकाने दाखवताना अर्जुन,प्रणव आणि श्रीश. "बघ स्वानंदी, माझं चित्र किती सुंदर आहे"! असं म्हणणारी अडीच वर्षाची प्रितुषा
 झेक रिपब्लीकच्या जेरीने कागदाशिवाय दगडावर देखील रंगरंगोटी करून कौतुकाची थाप मिळवली.
जेरी आणि त्याने रेखाटलेला केशरी देव.

सर्वाना त्यांच्या आवडता खाऊ मिळाला होता आणि भरपूर 🏆🏆देखील .. कौतुक सोहळा अगदी आनंदात पार पडला.
निसर्गाच्या कुशीत उदयास आलेली कलाकृती


वेळ पुढेच चालला होता. त्या रंगीबेरंगी क्षणांमधून चमूंना बाहेर आणणं आम्हाला देखील नकोस झालं होत. पण सायंकाळच्या छटा क्षितिजावर उभ्या होत्या. .. आणि आमची 🚆लोणावळा स्टेशनवर... !!!!

लेख आवडला असल्यास आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा आणि आपल्या मित्र-मैत्रिणीसोबत देखील व्हाट्स अप,फेसबुकवर शेअर करा.

अत्ता पर्यंत आम्ही भेटी दिलेल्या अनेक ठिकाणांची, किल्यांची, वेगवेगळ्या परिसराची अधिक माहिती माझ्या https://www.swachandi.com/ या वेबसाईटवर नक्की वाचा.



Comments