प्रबळगड !! अनुभवाने आम्ही देखील "प्रबळ"झालो
भव्य आकारमान आणि विस्तृत परिसर तितकीच जरा चढाईला कठीण अशी ही प्रबळ माची.
कलावंतीण वरून दिसणारा अफाट असा प्रबळगड
आदल्या दिवशी पायथ्यापासून सुमारे २ तास मजल दरमजल करत आमची स्वारी एका ठिकाणी पोहचली. त्याच दिवशी कलावंतिणी ला भेट देऊन सायंकाळचा सूर्यास्त चहाचा घोट घेत घेत अनुभवाला होता हे आठवतंय.
चार वित जागेत उभारलेला टेन्ट हिवाळाच्या थंडीत आसरा देऊन जातो. स्वानंदी- माझी मुलगी... टेन्ट म्हणजे तिच्या लेखी कधीही, कुठेही उभारता येईल असा महाल व कुठेही घेऊन जाता येणार घर ! खरं पाहता आमच्यासाठी तेच सत्य आहे.
टेन्टचा आसरा मिळाला. प्रत्येक ट्रेकच्या प्रवासात माझा सर्वात आवडता क्षण म्हणजे, गप गप जेवून भुकेल्या पोटाला शांत करायचं मग कुडकुडत शेकोटी जवळ उब अनुभवत तारे न्याहाळायचे. या दिवशी चंद्राने जरा आराम घेतला होता त्यामुळे सर्व ताऱ्यांना आपल्या रूपाची उधळण करता आली.
आकाशात काळोख चढत चालला होता. सकाळ पासूनचा थकवा हात पाय असल्याची जाणीव करून देत होता.. एक प्रकारचं संगीत पायांच्या गोळ्यात वाजत होत. ..ठस्स् ठस्स्!! . दोनही बुरुजांच्या छत्राखाली, हिवाळ्याच्या गारठ्यात रात्र घालवायची होती. आम्हा भटक्यांना अशी रात्र घालवायला शेकोटी शिवाय बेस्ट काहीच वाटत नाही. चार पाच लाकडं गोळा करायची, मुठभर काड्या,गवत, कपभर रॉकेल आणि मग.. भडका !
टेन्ट मधून दिसणारे मनोहारी दृश्य. डावीकडे कलावंतीण आणि उजवीकडे प्रबळगड
दुसऱ्या दिवशीची सकाळ मनोहरी होती. सूर्य उगवला. टेन्ट चे दार उघडताच डावीकडे धुक्यातून डोकावणारी कलावंतिणी तर उजवीकडे प्रचंड प्रबळमाची खुणावत होती. सकाळी सहा वाजता धुक्यात तोंडाचे वाफारे सोडत अनोखा नजराणा पाहून मन प्रसन्न झाले. पुन्हा एकदा नवीन सकाळ! नवा प्रवास! माझ्या डोळ्यातील आनंद पक्षांनी टिपला असावा, माझ्या नाचऱ्या मनाला त्यांच्या संगीताची साथ लाभत होती.
पोरगी गाढ झोपेत होती. टेन्ट मधल्या चादरीला ब्लॅंकेटची उब नक्कीच आली असावी इतकं गुरफटून घेतलं होत तिने स्वतःला. सकाळ सर सर पुढे सरकत होती. लांबचा पल्ला गाठून येथून आम्हाला घराकडे देखील निघायचं होत.. माझ्या चिमणीला त्या उबदार घरट्या बाहेर काढणं मला भाग पडलं. प्रबळगडाकडे प्रवास चालू झाला.
वाड्यांचे उरले सुरलेले अवशेष अत्यंत कलात्मक आहेत . त्यावरील नक्षीकाम आजही जिवंत वाटते. काळ्या दगडांमधील हे विखुरलेलं सौंदर्य मनाला भुरळ पाडते हे मात्र खरे. तीन ते चार असे हे एका रेषेत स्थिरावलेले वाडे कारवीच्या (झुडपांचा प्रकार) जाळ्यात दडलेले आहेत. त्यामुळे सहज लक्षात येत नाहीत. कधी गेलात तर न विसरता अगदी हमखास पाहून या. त्यापुढेच गणपती मंदिर, पाण्याचे टाके, मुख्य म्हणजे माथेरानचे काही पैलू अगदी सहज पाहता येतात हि आनंदाची गोष्ट. असा हा साधारण एक ते दीड तासाचा हा फेरफटका चांगलाच घाम काढतो. हे सगळं पाहून पुन्हा एकदा आमची स्वारी माथ्याच्या मध्यभागी आली. आता आम्हाला आणखी एक पंधरा-वीस मिनिटे चालून डाव्या बाजूच्या म्हणजेच कलावंतिणीच्या बाजूला जायचे होते. "कलावंतीणि" म्हणजे आम्हा गिर्यारोहकांच्या मनातील राणी. आकाशाला गवसणी घालणारे तिचे सौंदर्य बघण्यासारखे आहे. तिची नागमोडी वाट पाहण्याचा उत्तम केंद्रबिंदू म्हणजे - प्रबळमाची!
केवळ कलावंतिणीच्या रूपाची एक छबी डोळ्यात उतरवण्यासाठी आणि मनात भरून घेण्यासाठी ची ही तरफड अखेर कारणी लागली. मुलीला देखील उंचावरून दिसणारी कलावंतीण फारच आवडली.
बराच वेळ झोपेत असलेली स्वानंदी. गडाच्या पायथ्याशी
पायथ्यापासूनच चांगलीच चढण असलेला हा किल्ला दमछाक करवतो. किल्याकडे जाण्याचा संपूर्ण मार्ग दगड - धोंड्यातून जातो. त्यामुळे एक एक पाऊल मला जपून टाकावे लागत होते. चढ -चढ आणि नुसता चढच. दोन तासांनी आम्ही एका घळीत पोहचलो. स्वानंदीला खाली उतरवल. तिने देखील या ठिकाणी किल्ला सर करण्याचा आनंद घेतला.
घळीची थंडगार वाट
अवघे चार तास लागले माथ्यावर पोहचायला. अधे-मधे काकडी, लिंबू सरबत याची चंगळ तर होतीच आणि ते गरजेचं देखील होत. आमच्या बारा किल्यांच्या प्रवासातील सर्वात मोठा आणि संपता न संपणारा लांब पल्ल्याचा हा ट्रेक!
हुश्श ! पोहचलो एकदाच
प्रबळ गडाच्या माथ्यावर पोहचलं कि संपूर्ण सपाट मैदान आहे. एक वाट डावीकडे कलावंतिणीकडे घेऊन जाते, तर दुसरी उजवीकडील वाट गडावरील मंदिर आणि वाड्यांचे उरलेले काही अवशेष यांकडे.
वाड्यांचे उरले सुरलेले अवशेष अत्यंत कलात्मक आहेत . त्यावरील नक्षीकाम आजही जिवंत वाटते. काळ्या दगडांमधील हे विखुरलेलं सौंदर्य मनाला भुरळ पाडते हे मात्र खरे. तीन ते चार असे हे एका रेषेत स्थिरावलेले वाडे कारवीच्या (झुडपांचा प्रकार) जाळ्यात दडलेले आहेत. त्यामुळे सहज लक्षात येत नाहीत. कधी गेलात तर न विसरता अगदी हमखास पाहून या. त्यापुढेच गणपती मंदिर, पाण्याचे टाके, मुख्य म्हणजे माथेरानचे काही पैलू अगदी सहज पाहता येतात हि आनंदाची गोष्ट. असा हा साधारण एक ते दीड तासाचा हा फेरफटका चांगलाच घाम काढतो. हे सगळं पाहून पुन्हा एकदा आमची स्वारी माथ्याच्या मध्यभागी आली. आता आम्हाला आणखी एक पंधरा-वीस मिनिटे चालून डाव्या बाजूच्या म्हणजेच कलावंतिणीच्या बाजूला जायचे होते. "कलावंतीणि" म्हणजे आम्हा गिर्यारोहकांच्या मनातील राणी. आकाशाला गवसणी घालणारे तिचे सौंदर्य बघण्यासारखे आहे. तिची नागमोडी वाट पाहण्याचा उत्तम केंद्रबिंदू म्हणजे - प्रबळमाची!
केवळ कलावंतिणीच्या रूपाची एक छबी डोळ्यात उतरवण्यासाठी आणि मनात भरून घेण्यासाठी ची ही तरफड अखेर कारणी लागली. मुलीला देखील उंचावरून दिसणारी कलावंतीण फारच आवडली.
गप्पा गोष्टी करत जरा वेळ या ठिकाणी घालवला.
ऊन चांगलाच वाढलं होत. परतीचा मार्ग खुणावत होता. शिवाजी महाराज्यांच्या प्रतिमेचे दर्शन घेऊन आम्ही पुन्हा एकदा त्याच रस्त्यानी परतीला निघालो. प्रबळ माचीच्या दर्शनाने आणि अनुभवाने आम्ही देखील "प्रबळ"झालो असे म्हणायला हरकत नाही.
लेख आवडला असल्यास खालील कंमेंट बॉक्स मध्ये कंमेंट लिहा. तुमच्या ट्रेकर असणाऱ्या मित्र-मैत्रणीला नक्की शेअर करा.
संपूर्ण प्रवासाचा अनुभव घेण्यासाठी "प्रबळगडाचा" व्हिडीओ नक्की बघा. 👇

Hats off.... तुम्ही कमाल आहातच ������ तुमचे छोटुकली तुमच्या पेक्षाही चार पावलं पुढे आहे��������
ReplyDelete