'महादेवाचा डोंगर' २०२२ ची सुरुवात
२०२२ ची सुरुवात चांगली झाली. घरातल्यांसोबत कुलदैवताचे दर्शन घेऊन आमच्या गिरिभ्रमंतीला सुरुवात झाली आहे. या वर्षीचा पहिला ट्रेक म्हणून आम्ही आमच्या गावाजवळील - 'महादेवाचा डोंगर' चढण्याचे ठरवले. नावाप्रमाणेच डोंगरावर शंकराचे मंदिर आहे म्हणून याला महादेवाचा डोंगर अस म्हणतात. सांगोला तालुक्यातील, टिपेआळी, म्हणून हे गाव.
मुलांना घेऊन ट्रेक साठी नेमकं कुठे घेऊन जात येईल. किंवा योग्य ठिकाण कसं निवडावं? या वर प्रकाश टाकणारा लेख
अनेकजण, विशेषतः महिला मला नेहमीच प्रश्न विचारतात कि मुलांना घेऊन ट्रेकसाठी नेमकं कुठे जाता येईल किंवा योग्य ठिकाण कसं निवडावं?
आज आम्ही त्या तिथे दिसणाऱ्या पवनचक्कीला हात लावायला जाणार आहोत
आमच्या सोबत २-३ लहान मुले होती आणि आम्ही तिघे मोठे असे सर्वजण सकाळी डोंगरावर चढाई साठी निघालो.
ठिकाण शोधताना किंवा एखाद्या डोंगरावर, किल्यावर चढाई करताना त्या गावातील किंवा भागातील जाणकार लोक सोबत असण फार गरजेचे आहे. म्हणजे ठिकाण कितीही माहितीतील असल तरीही ग्रुप मध्ये ट्रेक करा. लहान मुलांना घेऊन एकट्याने ट्रेक करणे टाळा.
ठिकाण शोधताना किंवा एखाद्या डोंगरावर, किल्यावर चढाई करताना त्या गावातील किंवा भागातील जाणकार लोक सोबत असण फार गरजेचे आहे. म्हणजे ठिकाण कितीही माहितीतील असल तरीही ग्रुप मध्ये ट्रेक करा. लहान मुलांना घेऊन एकट्याने ट्रेक करणे टाळा.
किमान ३-४ पाण्यासाठी ब्रेक घेतले
स्वानंदीसाठी माझ्या सोबत नेहमीच काही ना काही खाण्यासाठी असत. जस चॉकलेट,गोळ्या,लाडू असं. आवडत जिन्नस सोबत बाळगलं तर मुल खात खात त्या ट्रेकचा आनंद घेतात. जर मुलांसोबत (पाच-सहा वयोगटातील) पहिला किंवा दुसराच ट्रेक असेल तर ट्रेक साधारण ५-६ किलोमीटर् अंतराचाच असावा. सोबत खाऊ बाळगावा म्हणजे ब्रेक (पाण्यासाठी असावा) घेतल्यावर मुलांच्या आवडीच्या गोष्टी त्यानं देता देतात आणि पुढील ब्रेक झाल्यावर परत खाऊ मिळणार म्हणून देखील मुलं नीट ट्रेक करतात.
४५-५० मिनिटात आम्ही माथ्यावर पोहचलो. डोंगरावर विस्तृत पठार, त्या पठारावर वाऱ्यावर डुलणारी ज्वारीची कणसं, त्यात स्वतःच्या तालावर गोल-गोल फिरणारी पवनचक्की. हा नजारा म्हणजे आमच्या आत्तापर्यंतच्या डोंगरयात्रेतीच्या सर्वात वैशिष्ठपूर्ण आणि वेगळा अनुभव. या आधी पवनचक्की इतक्या जवळून पाहण्याचा योगच कधी आला नव्हता. एक नाही तर किमान १५-२० विंडमिल्स त्या परिसरात असतील. मुलांनी एका पवनचक्कीच्या ठिकाणी मुक्काम ठोकला आणि विंडमिल्सच्या जिन्यावर वर-खाली उड्या मारून, त्यावर आडवं-तिडवा होऊन जाम धमाल केली.
डोंगरावर विस्तृत पठार, त्या पठारावर वाऱ्यावर डुलणारी ज्वारीची कणसं, त्यात स्वतःच्या तालावर गोल-गोल फिरणारी पवनचक्की.अशा ठिकाणी घड्याळ बाजूला ठेवून मुलांना जे हवं ते करून द्या, पडेल तर पडू द्या पण अनुभव घेऊ द्यात . कारण अशा आठवणीच अखेर हसवतात!
विहीर आमची वाट पाहत होती.
दाण्याने भरत आलेल्या कोवळ्या कणसाचे दाणे गोड़ लागत होते. त्या वातावरणात कोवळ्या धान्याचा वास पसरला होता. उर भरून श्वास घेतला तरी तरी मन भरत नव्हत. कणसं-कणसं डोलून आमच स्वागत करत होती. ती कोवळी कणसं बघून चुल आठवायला लागली होती. चुलीतील हुरड्याची चव नकळतच जिभेवर उतरायला लागली. शेतात फिरून-बागडून मन भरल. खाली उतरायची वेळ झाली होती. पुढे विहीर आमची वाट पाहत होती.
विंडमिल्सच्याच्या सावलीत आराम करायची मजा काहीच औरच! शहरातील, सर्व व्याप कुठेतरी दूर सोडून इथे अशा शांत ठिकाणी वर्षातून एकदा पळून येण्यास काही हरकत नाही.


छान
ReplyDelete